आपण इंग्रजीत खालील प्रकारे विचारपूस करू शकतो.
इतर विचारपूस अभिवादानानंतर तुम्ही खालील प्रकारचं एखाद वाक्य बोलू शकता. How are you ? How are things? How is everything? अशा प्रश्नांची उत्तर खालीलप्रमाणे दिलं जाऊ शकतं. Fine. Fine, thanks. I am fine. किंवा तुम्ही म्हणू शकता :- Okay. Same as usual. ( नेहमीसारखंच/ रोजसाराखंच ) तू कसा आहेस अशा प्रश्नाचे उत्तर दिल्यावर आपण समोरच्या व्यक्तीबद्दल सुद्धा लगेच चौकशी करू शकतो. अशा प्रकारे :- I am fine. How about you? (मी चांगला आहे. तू कसा आहेस? ) या वाक्याला प्रतिसाद खालील प्रमाणे देता येईल. I am fine too. ( मी पण चांगला आहे.)