अंत नसलेल्या गोष्टीचा अंत
अंत नसलेल्या गोष्टी चा अंत कसा करायचा हाच खरा प्रश्न आहे, पण या जगात प्रत्येकाचा अंत निच्छित आहे. आता पर्यंत जर अंत नसलेली एखादी गोष्ट असेल तर ती फक्त ब्रम्हांड च आहे. कि जिचा अंत निच्छित झालेला नाही. ती अनंत आहे. पण तिला हि कुठे तरी अंत असेल कारण या विश्वात प्रत्येकाचे एक आयुष्य आहे. जे कधी ना कधी संपणार आहे. त्या मुळे या विश्वात या ब्रम्हांडाचा हि अंत सापडेलच, फक्त शोध घेण्याची गरज आहे. आणि ती शोध घेण्याची सवय माणसाला काही करता शांत बसू देत नाही. माणसाने शोध घेऊन पृथ्वीचा अंत कसा होणार या बद्दल तर्क वी तर्क जोडले आहेत. पण खरे कारण आणखी समोर आले नाही कि, या पृथ्वीचा अंत कसा होणार प्रगती करण्याच्या नादात आपणच या पृथ्वीचा अंत करतो कि काय असा प्रश्न पडला आहे. कारण आपली संशोधन करण्याची जी गती आहे. ती फार अफाट आहे. आपण फार कमी वेळेत खूप काही शोधून काढू शकतो. आपले प्रगत विज्ञान हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. आपण करत असलेले प्रयोग खरच माणसाच्या गरजेचे आहे का ? कि खरच मानवाला...