स्मरणशक्ती वाढविण्यासाठी ब्लूबेरी उपयुक्त
स्मरणशक्ती वाढविण्यासाठी ब्लूबेरी उपयुक्त फळं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असल्याने ती खाण्याचा सल्ला हा आवर्जून दिला जातो. ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी आणि ब्लॅकबेरीसारख्या बेरीज अनेकांना प्रचंड आवडतात. बेरीज मेटाबॉलिजम बूस्ट करतात आणि फॅटी लिव्हरची समस्या दूर करतात. याचबरोबर डायजेस्टिव्ह सिस्टीममधून टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी देखील मदत करतात. ब्लूबेरी खाणं हे वयोवृद्ध व्यक्तीसाठी अत्यंत चांगलं असतं असं म्हंटलं जातं. मात्र ब्लूबेरी हि सर्व वयोगटातील मंडळींसाठी फायदेशीर ठरते. एका रिसर्चमधून हि माहिती समोर आली आहे. ब्लड प्रेशर आणि स्मरणशक्तीबाबत असलेल्या समस्या दूर करण्यासाठी ब्लूबेरी संदर्भातील नवीन माहिती समोर आली आहे. द जर्नल ऑफ जेरेन्टलॉजि सिरीज या बायोलॉजिकल सायन्सेस अँड मेडिकल सायन्सेसमधील प्रसिद्ध झालेल्या एक अहवालात ब्लूबेरीचे फायदे सांगितले आहे.