परिभाषा : तंत्र , स्वरूप, उपयोजन..
परिभाषा : तंत्र , स्वरूप, उपयोजन.. परिभाषाची व्याख्या, स्वरूप, वैशिष्ट्ये खलील प्रकारे स्पष्ट करता येईल. भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या ' शासन व्यवहारात मराठी' या पुस्तकातील परिभाषा ची व्याख्या :- " एखाद्या विशेष ज्ञानाच्या क्षेत्रात निच्छित व एकाच आर्थि प्रयुक्त होणारा व व्याख्येचा द्वारा व्यक्त होऊ शकणारा कल्पनेचे धनिरुप प्रतीक असणारा शब्द म्हणजे पारिभाषिक शब्द होय. चेम्बर्स टेक्निकल डिक्शनरी या ग्रंथातील व्याख्या:- पारिभाषिक शब्द हे विशिष्ट विषयातील तज्ञ अथवा तंत्रज्ञ नव्याने तयार करतात, दुसर्या भाषेतून येतात वा अन्य विषयांतील किंवा क्षेत्रांतील परिभाषेतून ग्रहण करतात किंवा दुसर्या भाषेतील शब्द त्यातील कल्पनेसहीत आपल्या भाषेशी जुळता करून घेतात. विष्णुशास्त्री चिपळूणकर प्रत्येक शास्त्राला त्याचे त्याचे असे ठरलेले काही शब्द असतात. त्यास संस्कृतात परिभाषा म्हणतात. असे जे नवे शब्द बनवायचे त्यात इतके गुण असावे लागतात. एक तर या शब्दांचे व...