नासा चा तिसरा चमू
नासा चा तिसरा चमू 'स्पेस एक्स ' ने अंतराळात पाठविला तिसरा चमू , एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स ने अमिरेकेच्या अंतराळात संशोधन संस्थेच्या ( नासा) चार आंतराळवीरांना अंतराळात पाठविले. सुमारे २४ तास प्रवास करून ते आंतरराष्टीय स्पेस स्टेशनवर दाखल होतील. चारही अंतराळवीर स्पेस एक्स मध्ये ६ महिने मुक्कामी राहणार आहे. स्पेस एक्स तर्फे पाठविण्यात आलेला हा तिसरा चमू आहे. यासाठी स्पेस एक्स ने जुन्या ड्रॅगन या अंतराळ वाहनात काही किरकोळ दुरुस्ती व बदल करून पुनर्वापर केला. या वाहनाचा यापूर्वी अंतराळवीरांना पाठविण्यासाठी वापर करण्यात आला होता. या वेळी पाठविण्यात आलेले अंतराळवीर अमेरिका, जपान, आणि फ्रांस चे आहेत. यापैकी फ्रांस चे थॉमस पेस्केट हे स्पेस एक्स च्या वाहनात प्रवास करणारे पहिले युरोपियन ठरले आहेत. वर्षभरात च स्पेस एक्स ने तीन चमू स्पेस स्टेशनवर पाठविले आहेत.....