शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ

शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ स्व सामर्थ्याने निर्माण केलेल्या स्वराज्याचा कारभार व्यवस्थित चालवा. स्वराज्यप्रती जनतेची आणि परकीयांची चांगली भावना असावी. त्यांच्या आणि स्वराज्यात सुसंवाद रहावा अशा अनेक कार्यासाठी राजांनी अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली होती. राज्याभिषेकासमयी या आठ प्रधंनाची पगारी नेमणूक करण्यात आली होती. १) पेशवा / पंतप्रधान हा सर्वात जबाबदार प्रधान असून मुलुकी आणि लष्करी प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याचे काम त्याकडे सोपविले होते. त्यादृष्टीने राजपत्रावर शिक्का मारण्याचा त्याला अधिकार होता. राजाच्या आदेशा प्रमाणे प्रदेशाची व्यवस्था लावणे. प्रदेशाचे संरक्षण करणे आणि स्वतः युद्ध प्रसंगी हजर राहणे ही अत्यंत महत्वाची काम प्रधानाकडे सोपविली होती.राज्याभिषेक प्रसंगी महाराजांनी मोरोपंत पिंगळे यांना पंतप्रधान म्हणून नेमले. २) अमात्य हा दूसरा महत्वाचा प्रधान असून त्याच्याकडे राज्याची अर्थव्यवस्था पाहण्याचे काम सोपविण्यात आले होते. शिवाय युद्ध प्रसंगाला त्यालाही रांनागणावर हजर राहावे लागत असे...