पोस्ट्स

जागतिकीकरण .. लेबलसह पोस्ट दाखवत आहे

जागतिकीकरण ..

जागतिकीकरण  साधारणपणे १९९० च्या सुमारास आपण या संकल्पनेच्या अधिक जवळ गेलो. यावर्षी आपण खासगीकरण , उदारीकरण आणि जागतिकीकरण या त्रयींचा स्वीकार केला. यामुळे झाले असे की, भारत अगोदरच बाजारपेठ म्हणून वापरणार्‍या लोकांना आपण आपल्या देशाचे दरवाजे उघडून दिले. याचा अर्थ असा की, आता परकीय लोक आपल्या देशात नवीन व्यवसाय सुरू करू शकतात. नवीन उत्पादन निर्मिती करू शकतात. ते इथे म्हणजे आपल्या देशात विकू शकतात. आपण ही त्यांच्या देशात गुंतवणूक करू शकतो. तिथे उत्पादन घेऊ शकतो. परकीय लोक आता आपल्याकडे येतात. आपण तिकडे जातो हे इतके स्वाभाविकपणे घडते की, आपण आपल्या तालुक्यातून दुसर्‍या तालुकात जावे. इंटरनेटच्या माध्यमातून आपण इतके जवळ आलो आहोत की, जगातल्या कोणत्याही इसमाशी आपण समोरासमोर बोलू शकतो. त्याच्याकडे असणारी हवी ती वस्तु खरेदी करू शकतो.त्याला काही सेकंदाच्या आत आपण पत्र पाठवू शकतो. थोडक्यात, जागतिकीकरनामुळे  नाहीतर १९९० च्या नंतर जगात जो काही झपाट्याने बदल झाला आहे या सर्वांचा परिणाम भारतीय जीवनावर झाला आहे. किंबहुणा तो जगातील कोणत्याही देशावर होऊ शकतो. अट फक्त एकच की, त्याने जगतिकीकरनाचा ...