हि अशी कथा आहे कि जिचा कधीच अंत नाही 4.

माझी भाषा माय मराठी मी मराठी आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल, तर ती गोष्ट आपण मागतो. ' मला पाणी पाहिजे.' , ' मला पुस्तक हवे आहे.' असे आपण सांगतो. आपण बोलून दाखवतो किंवा खुणा करून दाखवतो. आपल्या हातांची ओंजळ करून ती ओठांजवळ नेऊन दाखवतो. त्यावरून ' पाणी हवे आहे.' असे आपण सांगतो. मित्राचा निरोप घेताना आपण हात हलवतो. आपल्या मनात अनेक भावना येतात. कधी आपण आपुलकी दाखवतो. कधी आपण रागावतो. अशा भावना आपण शब्दांनी बोलून दाखवतो. आपल्या मनात अनेक कल्पना येतात. त्याही आपण शब्दातून व्यक्त करतो. आपण एकमेकांशी बोलतो. कधीतरी एखादी व्यक्ती समूहाला उद्देशून बोलते. अशा बोलण्यातून आपल्याला मन मोकळे केल्याचे समाधान मिळते.