मृत्यूनंतर
' मरणात खरोखर जग जगते...'. वारंवार वाचणार्याला या वाक्यात विरोधाभास आठवले . मरणामुळे जगातल्या व्यक्ती नामशेष होतात, स्मृतीतून देखील त्या नाहीशा होतात.परंतु येथे कवी म्हणतो की, मरणाने तर जगातील व्यक्ती जगतात. खोल विचार केला तर त्याचे म्हणणे खरे आहे! मरणानंतर च माणसाला अमर पद मिळते . परंतु सामान्य माणूस मृत्यूनंतर विसरला जातो. पण सत्कार्यसाठी मरण आले , तर त्यामुळे मनुष्य अमर होतो. पण हे अमर पद मिळवण्यासाठी माणसाला त्याग करावा लागतो , त्याशिवाय कीर्ती मिळत नाही.चंदन स्वतः झिजते व दुसऱ्याला सुगंध देते. सर्वस्वाचा त्याग चा नव्हे तर आत्मयज्ञ करायला माणसाने तयार राहिले पाहिजे. मरावे परी कीर्ती रूपे उरावे । या सामर्थ्य च्या उक्तीतही हीच गोष्ट सांगितली आहे. मृत्यू मुळे शरीराने मनुष्य नाहीस झाला , तरी त्याने केलेल्या बहुमोल कार्यासाठी तो कीर्ती रूपे तो जिवंत राहतो. संभाजीने धर्मा साठी मृत्यू परकरला , लोकमान्य टिळक , महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सारख्या त्यागी देशभक्तांच्या प्रचंड देश कार्यामुळे आज त्यांच्या स्मृती आपण अहनिर्षं जगवितो आहोत. मृत्...