एक हाताचा अंतर
एक हाताचा अंतर आज कोरोना असल्याकारणाने आपण सर्व जण खूप सारे अंतर ठेवून जगात आहो, पण आपण जर का आठवले तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल ती म्हणजे अंतर आणि आपले नाते हे फार पूर्वीचे आहे. फक्त ते आपल्या लक्षात नाही, ज्यावेळेला आपण सर्व शाळेत शिक्षण घेत होतो तेव्हा आपल्याला शिकवलं जायचे की आपण रांगेमध्ये उभे राहताना एक हाताचा अंतर ठेवायला पाहिजे जे ने करून आपला इतरांना त्रास होणार नाही. पण आपण सर्व बाल वयात असायचो त्या कारणाने आपल्याला भीती वाटायची कारण ही तसच आहे भीती वाटण्याचे कारण आपण कधीही खूप अंतर ठेवून जीवनाच्या प्रवासाला सुरवात केलेली नाही, आई च्या कुशीत असल्यामुळे अंतर हे आपल्याला नकोच होतं, आई सोडत नाही तर लगेच बाबा असल्याचे आणि बाबांनी जर सोडलं तर भाऊ किंवा बहीण ही नक्कीच असल्याचे त्यामुळे शाळेत नवीन गेल्यावर शिक्षिका किंवा शिक्षक आपल्याला सांगायचे की एक हाताचा अंतर ठेवा रंगेल नीट उभे राहा, एक हाताचा अंतर साधारणतः 2 फूट येईल आता नवीन ठिकाणी एवढे अंतर ठेवायचे म्हंटले तर कठीणच आहे राव,