पोस्ट्स

अभ्यासक्रमाचे स्वरूप लेबलसह पोस्ट दाखवत आहे

अभ्यासक्रमाचे स्वरूप

अभ्यासक्रमाचे स्वरूप विद्यार्थ्यांमधील अपेक्षित वर्तनाबदलासाठी त्यांना अध्ययन अनुभव द्यावे लागतात. त्यासाठी शिक्षकाने शालेय व शाळाबाहेर मिळणारे अनुभव यांचा समायोजनासाठी तयार केलेली योजना म्हणजे अभ्यासक्रम.    अभ्यासक्रम हे उद्दिष्ट्य प्राप्तीचे साधन आहे. अभ्यासक्रम संघटनात मानसशास्त्रीय व तर्कशास्त्रीय विचार महत्वाचे असतात.. प्रत्येक विषयांची रचना तर्कशुद्ध पणे झालेली आहे. विषयातील व्यापक नियम स्वरूपाचे नियम, व्याख्या मग त्याची उदाहरणे अशा शास्त्रीय मांडणीच्या स्वरूपात अभ्यासविषयक आला तर त्याचा व्यापविस्तार  त्यातील घटक-उपघटकातील संबंध हे विद्यार्थ्यांना चांगले आणि लवकर समजतात. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना काही विषय वा ज्ञानशाखा शिकवायच्या असतात. . 

अभ्यासक्रमाचे महत्व

अभ्यासक्रमाचे महत्व  १. ) अभ्यासक्रमामुळे विशिष्ट पातळीवरील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा भागविल्या जातात.  २.) योजना आखल्याशिवाय कोणत्याही कार्याची पूर्ती नाही. अभयसक्रम म्हणजे शैक्षणिक अनुभव देण्याची योजनांच असते.  ३.) अभ्यासक्रमामुळे शिक्षणक्षेत्राशी संबंधित असणाऱ्या आपापल्या  स्पष्टपणे  कळतात व त्या भूमिका पार पाडण्यासाठी संबंधित घटक क्रियाशील होतात.  ४.)अभ्यासक्रमामुळे राष्ट्रीय ध्यये  साध्य होण्यास मदत होती.  ५.) शिक्षणात समान गुणवत्ता राखण्यासाठी अभ्यासक्रमामुळे मदत होते.  

अभ्यासक्रम म्हणजे काय सांगून त्याचे स्वरूप , रचना निकष आणि तत्वे ...

अभ्यासक्रम म्हणजे काय  सांगून त्याचे स्वरूप , रचना निकष आणि तत्वे ... अभ्यासक्रमाचा Curriculum हा पर्यायी इंग्रजी शब्द आहे. Curriculum चा शब्दकोशातील अर्थ : The whole body of course offered by an education institution. शिक्षणसंस्था देत असलेला संपूर्ण पाठ्यक्रम course.    इतिहासाचे स्वरूप अतिशय विशाल आणि विविधांगी असल्यामुळे इतिहासाचा सर्वांना उपयुक्त असा आदर्श अभ्यासक्रम तयार करणे हे मोठे आव्हान आहे. कालपरत्वे व देशनिहाय इतिहास वेगळा राहिला तसेच इतिहासाच्या अभ्यासक्रमात राजकीय, धार्मिक, आर्थिक, व औद्योगिक विभागांचा समावेश होतो.         इतिहास  म्हणजे मानवी विकासाचा वृत्तांत होय. या इतिहासाच्या व्याख्येनुसार मानवाच्या इच्छा, आकांशा, त्याचे जीवन जगण्यासाठी केलेले प्रयत्न, सामाजिक संस्था, राजकीय सत्तास्थाने इत्यादींचा समावेश इतिहासाच्या अभयसक्रमात करणे क्रमप्राप्त ठरते. शिक्षकरूपी कलाकाराच्या हातातील असे एक साधन कि, ज्याद्वारे शिक्षक आपल्या ध्यये उद्दिष्टानुसार विद्यार्थ्यांना घडवू शकतो ते साधन म्हणजे अभ्यासक्रम .. व्याख्या ---     ...

अभ्यासक्रम रचनेची विविध पद्धती स्पष्ट करा.

                        अभ्यासक्रम रचनेची विविध पद्धती स्पष्ट करा -.  उत्तर - अभ्यासक्रमात त्या इयत्तेला असणाऱ्या सर्व  विषयांचा समावेश होतो. अभ्यासक्रम हि संपूर्ण योजना असते तर पाठ्यक्रम हा त्यातील एक भाग असतो. पाठ्यक्रम म्हणजे विशिष्ट इयत्तेसाठी विशिष्ट विषयाची अध्ययन अध्यापन योजना होय. अभ्यासक्रमांने ठरवून दिलेली निश्चित उद्दिष्ट्य गाठण्यासाठी पाठ्यक्रमाचा उपयोग करावा लागतो.           इतिहास या विषयाची व्याप्ती फार मिठी आहे. अनेक ऐतिहासिक व्यक्ती, त्यांचे कर्तृत्व, विविध साम्राज्य, त्यांची कारकिर्दी, लोकांचे सामाजिक, आर्थिक, सामाजिक व धार्मिक जीवन याचा इतिहासात समावेश होतो. तसेच मानव निर्मितीपासून तर आजपर्यंतचा काळ इतिहासात जमा होतो. इतिहासाची हि फार मिठी व्याप्ती लक्षात घेता हा इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडायचा कसा ? याची रचना कशी करायची ? हा एक फार मोठा प्रश्न असतो. निरनिराळ्या शिक्षणतज्ञांनी अभ्यासक्रम रचनेच्या सुचविलेल्या पद्धती पुढीलप्रमाणे :-  कालक्रम पद्धती     ...