इतिहास विषयाची संरचना राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला/साहित्य, विज्ञान, इतर स्थानिक प्रादेशिक राष्ट्रीय जागतिक. वरील संरचनेमध्ये इतिहासाचा काळ, ऐतिहासिक घटनेचे स्थळ आणि ऐतिहासिक घटनेचे क्षेत्र यांचा विचार केलेला आहे. इतिहासाची हि संरचना इतिहासाच्या प्रकारांवर अवलंबून आहे. म्हणजेच काळानुसार प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास, अर्वाचीन इतिहास अशी त्या त्रिमितीय ठोकळ्याची हि एक बाजू झाली. त्रिमितीय ठोकळ्याची दुसरी बाजू आहे. स्थळानुसार इतिहासाची ज्यात स्थानिक इतिहास, प्रादेशिक इतिहास, राष्टीय इतिहास आणि जागतिक इतिहास येतो. त्रिमितीय ठोकळ्याची तिसरी बाजू हि क्षेत्रानुसार किंवा ऐतिहासिक घटनेच्या विषयानुसार आहे. उदा. राजकीय इतिहास, सामाजिक इतिहास, आर्थिक इतिहास, धार्मिक इतिहास, कला व साहित्याचा इतिहास, विज्ञानाचा इतिहास व याशिवाय येणारे क्षेत्रे किंवा विषय यासाठी एक रकाना इतर या नावाने सोडला गेला. वरील ठोकळ्यामध्ये इतिहासाची कोणतीही घटना बसू शकते. उदा. पानिपतचे तिसरे युद्ध अशी घटना असेल तर वरील त्रिमितीय ठोकळ्यातील एक ठोकला बाजूला काढता येतो ज्याला पुन्हा तीन बाजू ...