पोस्ट्स

जानेवारी २२, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राम मंदिराला आलापल्लीच्या जंगलातील उच्च प्रतीचे सागवान....

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्या येथील राम मंदिराच्या उभारणीचे काम जोमाने सुरू आहे. या मंदिराच्या दरवाजांसाठी गडचिरोली जिल्ह्यातील उत्कृष्ट सागवानासाठी प्रसिद्ध असलेल्या आलापल्ली डेपोतील उच्च प्रतीच्या सागवान लाकडांचा वापर केला जाणार आहे. यासाठी लार्सन अँड टूब्रो कंपनीचा चमू आलापल्लीत दाखल झाला आहे.  आलापल्ली च्या जंगलातील उच्च प्रतीचे सागवान देशात प्रसिद्ध आहे. राम मंदिर ट्रस्टने आणि या मंदिराची उभारणी करत असलेल्या लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या चमूने देशाच्या इतरही काही भागातील सागवानाची चाचणी केली. पण राम मंदिराच्या उभारण्यात लागणाऱ्या दरवाजाचे आणि खिडक्यांसाठी अपेक्षित दर्जाचे सागवान त्यांना मिळाले नाही. आलापल्ली येथील महाराष्ट्र वन विकास मंडळाच्या डेपोतील (एफ डी सी एम) सागवान मात्र त्यांच्या पसंतीत उतरले आहे. याप्रमाणे लाकडांचा दर्जा तपासून उत्कृष्ट असणाऱ्या लाकडांची निवड करणे सुरू केले आहे. नक्षी कामासाठी होणार वापर आलापल्लीतील सागवानाचा वापर 45 दरवाजे खिडक्यांसाठी व राम मंदिराच्या पहिल्या माळ्यावरील धार्मिक चिन्हे कोरण्यास केला जाणार आहे. त्यासाठी सागवान कापून अयोध्येला न...

अंत नसलेल्या गोष्टी चा अंत भाग -2

अंत नसलेल्या गोष्टीचा अंत,शेवटी काय तर अंत नसलेल्या गोष्टीचा कधीही अंत नसेल असे मला वाटत आहे. आपण कितीही विचार केला तरी विषय नेहमी नविन असेल पण त्या विषयाचा अंत होणार नाही. विषय कोणताही असो जसे की जीवन जगणे असो किंवा जीवनाचा आनंद घेणे असो नेहमी जीवन जगतांनी आपल्याला अनेक अडचणी येतात. पण कर्तव्यदक्ष असणारे नेहमी प्रत्येक संकटांना सामोरे जातात.एखादे संकट आले म्हणून ते खचून जात नाही.नेहमी संकटांशी दोन हात करायला तयार असतात. जसे की आपण ज्यांना  छोटी छोटी संकटे म्हणतो ते मुळात छोटी नसतात. फक्त आपला समजण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो आपण एखाद्या संकटांना छोटे किंवा मोठे असे विभगतो पण मुळात संकट हे संकट असते ते कधीही छोटे किंवा मोठे नसतात. फक्त एखाद्या संकटावर उपाय लवकर मिळतो किंवा अनुभव असल्याकारणाने ते हाताळायला सोपे जाते म्हणजे ते संकट छोटे आहे असा त्याचा अर्थ होत नाही. उदा.आपण रस्त्याने चालतो तेव्हा जर आपल्या पायात एखादा काटा घुसला ते आपण घाई केली की तो काटा आपल्या पायात मोडतो, पण समजा अगोदर आपल्या पायात काटा मोडण्याचा अनुभव जर आपल्याला असेल तर दुसऱ्या वेळी मात्र आपण तसे होऊ नये यासाठी दक...