पोस्ट्स

सप्टेंबर ११, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन भाषण

धन्यवाद  मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे. सर्व प्रथम सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.  मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा महाराष्ट्रातील एक राजकीय उत्सव आहे. हा सन दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी १९४८ मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि ती भारताचा एक भाग बनली. १५ ऑगस्ट१९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता. त्यावेळीच्या  ५६५ पैकी ५६२ संस्थानांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दर्शवली आणि तशी कार्यवाही पण केली. मात्र जम्मू-काश्मीर, हैदराबाद संस्थान, व जुनागढ संस्थान हि तीन संस्थाने स्वतंत्र  भारतात सामील झाली नव्हती. हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान यांचे राज्य होते.  मीर उस्मान अली खान सिद्दिकी, असफ जाह सातवा ( जन्म ६ एप्रिल १८८६, मृत्यू २४ फेब्रुवारी १९६७ ) हा हैदराबाद आणि बरारचा शेवटचा निजाम होता. सन १९११ आणि १९४८ च्या दरम्यान त्याने हैदराबाद संस्थानावर राज्य केले. २६ जानेवारी १९५० रोजी हैदराबाद हे भारतातील नवे राज्य बनले. ...