सांस्कृतिक शब्दांच्या मागे अनेक महावंशाच्या इतिहास

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक शब्दांच्या मागे अनेक महावंशाच्या इतिहास उभा आहेत. स्थलमात्राभोवती अनेक महाकृत्यांची स्मारके उभी आहेत. महाराष्ट्राने भारतात ठिकठिकाणी मिळवलेल्या विजयाची चिन्हे अटकेपासून मद्रासपर्यंत आणि काठेवाड पासून कलकत्त्या पर्यंत अजून अस्थित्वात आहेत. भारतावर राजकीय व सांस्कृतिक परचक्रे आली तेव्हा त्यांचे निवारण व निर्मूलन महाराष्ट्राने केले आहे . शकपूर्व कालापासून ही महाराष्ट्राची परंपरा आहे. स्वतंत्र लक्ष्मीची पूजा महाराष्ट्राइतक्या एकनिष्ठतेने हिंदुस्थानातील दुसऱ्या कोणत्याही प्रदेशाने केलेली नाही. ग्रीक, शक, व कश्यप यांच्यासारख्या परक्याच्यांच नव्हे तर खरवेल व हर्षवर्धन यांसारख्या स्वकीयांची ही आक्रमनाला महाराष्ट्राने धीराने तोंड देऊन हरवले आहे .