क्षणभरच्या सुखासाठी आयुष वेचले मी, सुख शोधता शोधता क्षण वेचले मी. तुझ्या सहवासात सुख शोधले मी, तुझा सहवास शोधता शोधता क्षण वेचले मी. क्षणभरच्या सुखासाठी आयुष वेचले मी, सुख शोधता शोधता क्षण वेचले मी. तुझ्या हसण्याला माझं सुख मानलं मी, तुझ्या हसण्यासाठी क्षण वेचले मी. क्षणभरच्या सुखासाठी आयुष वेचले मी, सुख शोधता शोधता क्षण वेचले मी. तुझ्या नसण्याला माझं दुःख मानले मी, तुझ्या नसण्याचा विरह सहन करण्यासाठी क्षण वेचले मी. क्षणभरच्या सुखासाठी आयुष वेचले मी, सुख शोधता शोधता क्षण वेचले मी.