कालखंडात्मक पद्धत :
कालखंडात्मक पद्धत : या पद्धतीत विशिष्ट कालखंडाची निवड केली जाते व त्या कालखंडातील महत्वाची घटना प्रसंग, व्यक्ती, यांचा सविस्तरपणे अभ्यास केला जातो. बौद्ध धर्माचा विकास, मोगल कालखंड, भारतीय स्वातंत्र्याचा लढा या गोष्टी या कालखंडात येतात. या पद्धतीमध्ये कालक्रम पद्धती व प्याच प्याच पद्धती या दोन्ही पद्धतीचे मिश्रण आहे. परंतु या पद्धतीत कालखंडाच्या महत्वाच्या घटनावरच लक्ष केंद्रित केले जाते. पण त्यामानाने कमी महत्वाच्या गोष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष होते. त्यामुळे इतिहासाचे साम्यकदर्शन घडते. **** समकेंद्री पद्धत पेस्तोलॉजीच्या तत्वावर आधारित हि पद्धत आहे. त्यांच्या मते इतिहासाच्या माध्यमातून समाजाची पुनर्रचना करणे शक्य आहे. रामराज्य आणायचे हे तत्व या पद्धतीवर आधारित आहे. या पद्धतीत प्रथम अभ्यासाचा गाभा निश्चित केल्या जातो. विद्यार्थीचे वय व आकलन क्षमता घेऊन विषयाचे ज्ञान अधिक व्यापक केले जाते. व त्याबरोबर अभ्यासक्रमाचा अधिक विस्तार केला जातो. यात एक विशिष्ट बिंदूपासून एक लहान वर्तुळ रेखाटण्यात येते नंतर अधिक मोठे वर्तुळ रेखाटले जाते. लह...