महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाण यांनी आकाशवाणी च्या मुंबई केंद्रावरून दिलेले भाषण.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाण यांनी आकाशवाणी च्या मुंबई केंद्रावरून दिलेले भाषण. ग्रामीण शिक्षणाची माझी कल्पना: ग्रामीण शिक्षणाची माझी कल्पना मी आज आपणापुढे सांगावी अशी अपेक्षा आहे. परंतु ग्रामीण शिक्षणासंबंधी ची माझी कल्पना सांगण्यापूर्वी, शिक्षण म्हणजे काय याची थोडीफार कल्पना आपण समजून घेवूया. पुस्तक वाचून येणारे ज्ञान ते शिक्षण असे समजण्याची एक मोठी प्रथा आहे. आणि काही अंशी बरोबर आहे. परंतु खरे शिक्षण म्हणजे काय याचा अर्थ आपण सगळ्यांनी आपल्या मनाशी समजावून घेतला पाहिजे. मी माझ्या उपयोगासाठी शिक्षणाची एक सरळ आणि साधी व्याख्या करून ठेवली आहे. शिक्षित व्यक्तिला स्वतः च्या भोवती घडणार्या गोष्टी आणि जगामध्ये घडणार्या इतर गोष्टी यांची ज्यामुळे काही संगती लावता येते, त्याचा योग्य अर्थ समजावून घेता येतो, आणि त्यांचा परिणाम आपल्या जीवनावर काय घडतो. आपल्या व्यक्तिमहत्वावर काय घडतो हे समजावून घेता येते आणि समजावून देता येते, त्याला मी शिक्षण मानत आलो आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट मला आपल्या नजरेत आणावयाला पाहिजे ती अशी की जेव्हा ग्रामीण शिक्षण असा शब्द आ...