पोस्ट्स

परावर्तन पद्धत लेबलसह पोस्ट दाखवत आहे

परावर्तन पद्धत

परावर्तन पद्धती  वर्तमानकाळातील प्रश्नांची उकल भूतकालीन घटनांच्या आधारे केली जाणे परावर्तन होय. परावर्तन म्हणजे मागे वळून पाहणे. आजचा ज्वलंत प्रश्न घ्यायचा व या प्रश्नांची उत्पत्ती कशी झाली, भूतकाळात कोणकोणते प्रसंग घडले, घटना घडल्या, कोणती राजकीय स्थित्यंतरे झाली याचा शोध या पद्धतीच्या माध्यमातून घेतो येतो. उदा. महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद, काश्मीर प्रश्न. हे प्रश्न अभ्यासण्यासाठी घेऊन त्यांचे उत्तर शोधण्यासाठी भूतकाळातील विविध प्रसंग व घटनांचा आधार घ्यायचा. इतिहासातील कितीतरी घटनांचा अभ्यास या पद्धतीने करता येतो. उदा. बंगालची फाळणी, भारत- चीन युद्ध, कारगिल युद्ध अशा घटनांचा अभ्यास या पद्धतीने करता येतो.  इतिहास अध्यापनाच्या विविध उद्दिष्टात भूतकाळाची जिज्ञासा व वर्तमान काळाची जाणीव निर्माण करणे या दोन उद्दिष्टांची पूर्ती आपल्याला या पद्धतीने करता येते. भौतिकाळ व वर्तमान यांची सांगड घातली जात असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासात रुची वाटते. व तो मनोरंजक देखील होतो. दोष --   १. - या पद्धतीनुसार पाठ्यपुस्तक तयार करणे कठीण जाते. कारण अभ्यासक्रमाची मांडणी देखील सोपी नाही. ...