इंग्रजी बोलायला सुरवात करा ते पण अगदी सोप्या पद्धतीने. चला तर आपण सुरवातीला बघू अभिवादन कशा प्रकारे करतात ते. * एखाद्याला भेटल्यावर तुम्ही त्याला म्हणू शकता :- Hello. ( हलो ) ' हलो ' सोबत तुम्ही त्या व्यक्तीचे नाव सुद्धा घेऊ शकता :- Hello, Anita Hello, everyone. अनौपचारिक परिस्थिती मध्ये तुम्ही hello ऐवजी बोलू शकता :- Hi (हाई ) Hi , Anita . * जर तुम्ही वेळेनुसार अभिवादन करू इच्छित असाल तर रात्री १२ ते दुपारी १२ पर्यंत तुम्ही म्हणू शकता :- Good morning . दुपारी १२ ते सायंकाळपर्यंत Good Afternoon सायंकाळ ते रात्री बारापर्यंत Good evening अनौपचारिक परिस्थितीत अभिवादन करण्यासाठी फक्त म्हणता येईल Morning , Afternoon , किंवा Evening असे म्हणता येईल. Morning , Evening , सोबत त्या व्यक्तीचे नाव पण जोडता येईल . Morning Gopal . Afternoon , Anita . Good morning म्हणणाऱ्याला तुम्ही Good morning किंवा फक्त Morning असे उत्तर देऊ शकता. Good afternoon आणि Good...