भगवान महावीर ( "अहिंसा परमो धर्म " )

भगवान महावीर "अहिंसा परमो धर्म " संपूर्ण विश्वामध्ये धर्म हा जीवाला कल्पवृक्षा प्रमाणे सर्व मनोरथ पूर्ण करणारा आहे. प्रत्येक प्राणिमात्राला दुःखरूपी संसारसमुद्रातुन तारणारा आहे. 'हे भव्य जीवांनो सर्वांनी धर्माचे पालन करून सतत धर्मचरणामध्ये लिन होऊन त्या प्रमाणे आचरण करून शुभ आणि शुद्ध भाव ठेवून शाश्वत अशा मोक्ष सुखाची प्राप्ती करून घ्यावी ' हि भगवंताची दिव्या वाणी आहे. सध्या स्थितीत मानवामध्ये स्वार्थी, हिंसक,लोभी वृत्ती सतत वाढत चाललेली आहे. अधिक अधिक ,कसे मिळेल, सत्ता भोगविलास इ. यासाठी च सर्व जीवनउर्जा संपविली जात आहे. वचन भाषणाला आता किंमतच राहिलेली नाही. बोलण्याने कोणाची मने दुखावतील, तर कोठे वैर, द्वेष उत्पन्न होईल,याची आता भीतीच राहिलेली नाही. मायाचारी इतकी अं...