पोस्ट्स

भुरुपशास्त्र व खाणकाम ( Geo-morphology and Mining ) लेबलसह पोस्ट दाखवत आहे

भुरुपशास्त्र व खाणकाम ( Geo-morphology and Mining )

  भुरुपशास्त्र   व खाणकाम (  Geo-morphology and Mining ) भुरुपशास्त्रामध्ये खडक आणि खडकांच्या रचनेचा अभ्यास केला जातो. त्यावरून कोणत्या प्रदेशामध्ये स्तरीत खडक , अग्निजन्य व रूपांतरित खडक आढळतात हे समजते. खनिजाचे मिश्रण म्हणजे खडक होय. कोणताही खडक दोन किंवा त्यापेक्षा अधिक खनिजांपासून   तयार होत असतो. विविध प्रकारच्या खडकामध्ये वेगवेगळ्या प्रकारची खनिजे आढळून येतात. जेथे खडकांमध्ये एकाच प्रकारच्या खनिजाचे प्रमाण जास्त असते , त्या ठिकाणी खाणकाम व्यवसाय चालू शकतो. भूपृष्ठरचनेच्या दृष्टिकोनातून एखादा दुर्गम प्रदेश असला तरी खनिजाच्या म्हत्वानुसार त्या ठिकाणी खाणकाम व्यवसाय चालू शकतो. अलास्कासारखा दुर्गम प्रदेशात सोने सापडले आहे. त्यामुळे त्या प्रदेशाला महत्व प्राप्त झाले आहे. स्तरीत खडकामध्ये वनस्पति आणि प्राणी यांचे अवशेष गाडले गेलेले असतातत. त्यामुळे स्तरीत खडकामध्ये दगडी कोळसा आणि खनिज तेल मोठ्या प्रमाणावर सापडते , तर ज्या ठिकाणी ज्वालामुखी क्रिया मोठ्या प्रमाणावर होऊन गेलेल्या आहेत . अशा प्रदेशात रूपांतरित खडक मोठ्या प्रमाणावर सापडतात. रूपांतरित खडकाला आर्थ...