कथा कथित गावमधील तुझ्या माझ्या गप्पागोष्टी

तुझ्या माझ्या गप्पा गोष्टी हि पूर्णतः नवीन कल्पना आहे. या मध्ये अनेक काल्पनिक पात्र आहेत. जसे आई, वडील, मुलगा, बहीण, भाऊ, मित्र, मैत्रीण इत्यादी...... थोडक्यात माहिती सांगायची झाल्यास खालील प्रमाणे सांगता येईल. आपला जन्म झाल्या पासून तर आपण मरे पर्यंत आपल्या जीवनात काय काय घडते व आपण त्याला कशा प्रकारे सामोरे जातो. घरातील चित्रविचित्र प्रसंग आपण आपल्या मित्रांसोबत कशा प्रकारे शेअर करतो. असे अनेक प्रसंगाचे कथन या कथेत करणार आहे. अशा करतो कि आपल्या सर्वांना हि कथा नक्कीच आवडेल. सुरवात 'आई' या पात्र पासून करावी असे वाटत आहे. कारण आई हे प्रत्येकाचे प्रेरणास्थान असते. अर्थातच माझंही आहे. म्हणतात ना........ "स्वामी तिन्ही जगाचा आई वीणा भिकारी" * **** कथाकथित गावातील तुझ्या माझ्या गप्पा गोष्टी. एक छोटंसं गाव गावातील लोकसंख्या हातावर मोजता येईल एवढीच.