पोस्ट्स

वाक्याचे प्रकार. लेबलसह पोस्ट दाखवत आहे

वाक्याचे प्रकार. ४. ) होकारार्थी वाक्य : -

वाक्याचे प्रकार. होकारार्थी वाक्य : -   ज्या वाक्यामध्ये क्रियापद होकारार्थी असते त्या वाक्याला होकारार्थी किंवा करणरुपे असे म्हणतात.  याचे उदाहरण खलील प्रमाणे पाहता येईल. १) तो नेहमी खरे बोलतो. २) शिक्षकांचा आदर करावा. ३) मला पुस्तक वाचायला खूप आवडते. ४) मला सर्व बहीणीच आहे.             

वाक्याचे प्रकार 3 ) उद्गारार्थी वाक्य .

 उद्गारार्थी  वाक्य. ज्या वाक्यातून भावनेचा उद्गार स्पष्ट होतो अशा विधानाला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात.  याचे उदाहरण पुढीलप्रमाणे. 1 ) अरे ! आज इकडे कसे तुम्ही ? 2 ) अरे बापरे ! केवढा मोठा साप हा. 3 ) वा ! किती सुंदर चित्र आहे.  4 ) शी, शी ! किती कचरा झाला घरामध्ये.  5 ) बापरे ! त्या सभेला किती मोठी गर्दी होती.      

वाक्याचे प्रकार 2. प्रश्नार्थक वाक्य

 प्रश्नार्थक वाक्य .:- ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्या विधानाला किंवा वाक्याला प्रश्नार्थक वाक्ये असे म्हणतात.  त्याचे उदाहरण पुढील प्रमाणे सांगता येईल.  1) सध्या तू काय करीत आहे ?  2) इथला कप कुठे ठेवला ? 3) हा पेन कोणाचा आहे ? 4) तुम्ही अभ्यास कसा करता ? 5) आपण आपल्या स्वतःकडे लक्ष द्यायला नको का ? 

वाक्याचे प्रकार 1) विधानार्थी वाक्य

 वाक्याचे प्रकार  एखाद्या घटकाचा अर्थ स्पष्ट करणाऱ्या शब्दांचा समुच्चय म्हणजे वाक्य होय. परंतु या ठिकाणी केवळ शब्दांचा समूह असा त्याचा अर्थ अभिप्रेत नाही. तर त्या समूहातील शब्दापासून विशिष्ट अर्थ तयार होणे आवश्यक असते. आपण बोलतो किंवा लिहितो म्हणजे आपले विचार क्रमाक्रमाने आपण व्यक्त करतो. आपला एक संपूर्ण विचार म्हणजेच वाक्य होय. कोणतेही वाक्य हे दोन घटकांची पूर्ण झालेले असते. अशा अर्थानुसार वाक्यांचे वेगवेगळे प्रकार दिसून येतात ते पुढील प्रमाणे सांगता येईल.   १) विधानार्थी वाक्य      ज्या वाक्यांमध्ये केवळ विधान केलेले असते अशा वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. या वाक्यांमध्ये होकारार्थी  असेल तर त्याला होकारार्थी विधान ( करणरूप ) आणि वाक्य नकारार्थी असेल तर त्याला   "नकारार्थी" विधान असे म्हणतात. १) आपल्या अभ्यासाकडे आपण लक्ष द्यावे.  २) नरेंद्र मोदी यांच्या सभेला मोठी गर्दी होती.  ३) हे जग सुख दुः खाने भरले आहे. ४)    तुमचे उपकार मी मुळीच विसरणार नाही. ५) व्यक्ति आपल्या भविष्याचा शिल्पकार असतो. ६) मी रोज स...