पोस्ट्स

एप्रिल २५, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वाक्याचे प्रकार 2. प्रश्नार्थक वाक्य

 प्रश्नार्थक वाक्य .:- ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्या विधानाला किंवा वाक्याला प्रश्नार्थक वाक्ये असे म्हणतात.  त्याचे उदाहरण पुढील प्रमाणे सांगता येईल.  1) सध्या तू काय करीत आहे ?  2) इथला कप कुठे ठेवला ? 3) हा पेन कोणाचा आहे ? 4) तुम्ही अभ्यास कसा करता ? 5) आपण आपल्या स्वतःकडे लक्ष द्यायला नको का ? 

वाक्याचे प्रकार 1) विधानार्थी वाक्य

 वाक्याचे प्रकार  एखाद्या घटकाचा अर्थ स्पष्ट करणाऱ्या शब्दांचा समुच्चय म्हणजे वाक्य होय. परंतु या ठिकाणी केवळ शब्दांचा समूह असा त्याचा अर्थ अभिप्रेत नाही. तर त्या समूहातील शब्दापासून विशिष्ट अर्थ तयार होणे आवश्यक असते. आपण बोलतो किंवा लिहितो म्हणजे आपले विचार क्रमाक्रमाने आपण व्यक्त करतो. आपला एक संपूर्ण विचार म्हणजेच वाक्य होय. कोणतेही वाक्य हे दोन घटकांची पूर्ण झालेले असते. अशा अर्थानुसार वाक्यांचे वेगवेगळे प्रकार दिसून येतात ते पुढील प्रमाणे सांगता येईल.   १) विधानार्थी वाक्य      ज्या वाक्यांमध्ये केवळ विधान केलेले असते अशा वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. या वाक्यांमध्ये होकारार्थी  असेल तर त्याला होकारार्थी विधान ( करणरूप ) आणि वाक्य नकारार्थी असेल तर त्याला   "नकारार्थी" विधान असे म्हणतात. १) आपल्या अभ्यासाकडे आपण लक्ष द्यावे.  २) नरेंद्र मोदी यांच्या सभेला मोठी गर्दी होती.  ३) हे जग सुख दुः खाने भरले आहे. ४)    तुमचे उपकार मी मुळीच विसरणार नाही. ५) व्यक्ति आपल्या भविष्याचा शिल्पकार असतो. ६) मी रोज स...

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाण यांनी आकाशवाणी च्या मुंबई केंद्रावरून दिलेले भाषण.

 महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाण यांनी आकाशवाणी च्या मुंबई केंद्रावरून दिलेले भाषण.   ग्रामीण शिक्षणाची माझी कल्पना: ग्रामीण शिक्षणाची माझी कल्पना मी आज आपणापुढे सांगावी अशी अपेक्षा आहे. परंतु ग्रामीण शिक्षणासंबंधी ची माझी कल्पना सांगण्यापूर्वी, शिक्षण म्हणजे काय याची थोडीफार कल्पना आपण समजून घेवूया. पुस्तक वाचून येणारे ज्ञान ते शिक्षण असे समजण्याची एक मोठी प्रथा आहे. आणि काही अंशी बरोबर आहे. परंतु खरे शिक्षण म्हणजे काय याचा अर्थ आपण सगळ्यांनी आपल्या मनाशी समजावून घेतला पाहिजे. मी माझ्या उपयोगासाठी शिक्षणाची एक सरळ आणि साधी व्याख्या करून ठेवली आहे. शिक्षित व्यक्तिला स्वतः च्या भोवती घडणार्‍या गोष्टी आणि जगामध्ये घडणार्‍या इतर गोष्टी यांची ज्यामुळे काही संगती लावता येते, त्याचा योग्य अर्थ समजावून घेता येतो, आणि त्यांचा परिणाम आपल्या जीवनावर काय घडतो. आपल्या व्यक्तिमहत्वावर काय घडतो हे समजावून घेता येते आणि समजावून देता येते, त्याला मी शिक्षण मानत आलो आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट मला आपल्या नजरेत आणावयाला पाहिजे ती अशी की जेव्हा ग्रामीण शिक्षण असा शब्द आ...

परिभाषा : तंत्र , स्वरूप, उपयोजन..

 परिभाषा : तंत्र , स्वरूप, उपयोजन.. परिभाषाची व्याख्या, स्वरूप, वैशिष्ट्ये खलील प्रकारे स्पष्ट करता येईल.      भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या ' शासन व्यवहारात मराठी'  या पुस्तकातील परिभाषा ची       व्याख्या :- " एखाद्या विशेष ज्ञानाच्या क्षेत्रात निच्छित व एकाच आर्थि प्रयुक्त होणारा व व्याख्येचा द्वारा व्यक्त होऊ शकणारा कल्पनेचे धनिरुप प्रतीक असणारा शब्द म्हणजे पारिभाषिक शब्द होय.      चेम्बर्स टेक्निकल डिक्शनरी या ग्रंथातील व्याख्या:-     पारिभाषिक शब्द हे विशिष्ट विषयातील तज्ञ अथवा तंत्रज्ञ नव्याने तयार करतात, दुसर्‍या भाषेतून येतात वा अन्य विषयांतील किंवा क्षेत्रांतील परिभाषेतून ग्रहण करतात किंवा दुसर्‍या भाषेतील शब्द त्यातील कल्पनेसहीत  आपल्या भाषेशी जुळता करून घेतात.    विष्णुशास्त्री चिपळूणकर     प्रत्येक शास्त्राला त्याचे त्याचे असे ठरलेले काही शब्द असतात. त्यास संस्कृतात परिभाषा म्हणतात.    असे जे नवे शब्द बनवायचे त्यात इतके गुण असावे लागतात. एक तर या शब्दांचे व...

जागतिकीकरण ..

जागतिकीकरण  साधारणपणे १९९० च्या सुमारास आपण या संकल्पनेच्या अधिक जवळ गेलो. यावर्षी आपण खासगीकरण , उदारीकरण आणि जागतिकीकरण या त्रयींचा स्वीकार केला. यामुळे झाले असे की, भारत अगोदरच बाजारपेठ म्हणून वापरणार्‍या लोकांना आपण आपल्या देशाचे दरवाजे उघडून दिले. याचा अर्थ असा की, आता परकीय लोक आपल्या देशात नवीन व्यवसाय सुरू करू शकतात. नवीन उत्पादन निर्मिती करू शकतात. ते इथे म्हणजे आपल्या देशात विकू शकतात. आपण ही त्यांच्या देशात गुंतवणूक करू शकतो. तिथे उत्पादन घेऊ शकतो. परकीय लोक आता आपल्याकडे येतात. आपण तिकडे जातो हे इतके स्वाभाविकपणे घडते की, आपण आपल्या तालुक्यातून दुसर्‍या तालुकात जावे. इंटरनेटच्या माध्यमातून आपण इतके जवळ आलो आहोत की, जगातल्या कोणत्याही इसमाशी आपण समोरासमोर बोलू शकतो. त्याच्याकडे असणारी हवी ती वस्तु खरेदी करू शकतो.त्याला काही सेकंदाच्या आत आपण पत्र पाठवू शकतो. थोडक्यात, जागतिकीकरनामुळे  नाहीतर १९९० च्या नंतर जगात जो काही झपाट्याने बदल झाला आहे या सर्वांचा परिणाम भारतीय जीवनावर झाला आहे. किंबहुणा तो जगातील कोणत्याही देशावर होऊ शकतो. अट फक्त एकच की, त्याने जगतिकीकरनाचा ...

संस्कृति या शब्दाचा अर्थ

इमेज
 संस्कृति  या शब्दाचा अर्थ   संस्कृति  या संकल्पनेची आपण व्याख्या स्पष्ट करू शकत नाही. ती व्याख्या विरहित आहे. कारण ती काळानुरूप बदलत असते. बदलणार्‍या गोष्टीची एक संकल्पना  राहू शकत नाही.  संस्कृती म्हणजे लक्षणिक अर्थाने मानवी कृतीउक्तीजन्य समग्र वर्तनाचेच प्रगट दर्शन आहे. शेती, पशुपालन, स्थापत्य, धातुकाम, यंत्र निर्मिती, वस्त्रोत्पादन, अर्थोत्पादन, या गोष्टी ची संपन्नता भौतिक संस्कृतीत अभिप्रेत असते. धर्म, नीती, कायदा, विद्या, ललितकला, वाड:मय, सभ्यता, शिष्टाचार, इ. गोष्टीचा समावेश आध्यात्मिक संस्कृतीत होतो. या दोन्ही प्रकारच्या संस्कृतीत अनोण्यसंबंध आहे. मनुष्याच्या मानसिक आशा आकांक्षा ना भौतिक सुधारणामुळे मूर्त स्वरूप येते आणि भौतिक सुधारणाची इमारत आध्यात्माच्या पायावर उभी राहते.  तिला संस्कृतीचा दर्जा प्राप्त होतो. बाह्य समृद्धी बरोबर च मन, बुद्धी, पंचेद्रिये यावर नियंत्रण असावे लागते आणि हे सर्व  साध्य करण्याची जी प्रक्रिया तिला सामान्यता; संस्कृती असे म्हणतात . संस्कृतीचा संबंध मानवीजिवनाशी , समाजजीवनाशी आहे . जीवन गतिमान आहे , विकसनशील ...

शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ

इमेज
 शिवरायांचे अष्टप्रधान  मंडळ  स्व सामर्थ्याने निर्माण केलेल्या स्वराज्याचा कारभार व्यवस्थित चालवा. स्वराज्यप्रती जनतेची आणि परकीयांची चांगली भावना असावी. त्यांच्या आणि स्वराज्यात सुसंवाद रहावा अशा अनेक कार्यासाठी राजांनी अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली होती. राज्याभिषेकासमयी या आठ प्रधंनाची पगारी नेमणूक करण्यात आली होती. १) पेशवा / पंतप्रधान          हा  सर्वात जबाबदार प्रधान असून मुलुकी आणि लष्करी प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याचे काम त्याकडे सोपविले होते. त्यादृष्टीने राजपत्रावर शिक्का मारण्याचा त्याला अधिकार होता. राजाच्या आदेशा प्रमाणे प्रदेशाची व्यवस्था लावणे. प्रदेशाचे संरक्षण करणे आणि स्वतः युद्ध प्रसंगी हजर राहणे ही अत्यंत महत्वाची काम प्रधानाकडे सोपविली होती.राज्याभिषेक प्रसंगी महाराजांनी मोरोपंत पिंगळे यांना पंतप्रधान म्हणून नेमले.  २) अमात्य         हा दूसरा महत्वाचा प्रधान असून त्याच्याकडे राज्याची अर्थव्यवस्था पाहण्याचे काम सोपविण्यात आले होते. शिवाय युद्ध प्रसंगाला त्यालाही रांनागणावर हजर राहावे लागत असे...

शिवाजी महाराजांचा कौटुंबिक परिचय .

इमेज
  शिवाजी महाराजांचा कौटुंबिक परिचय .  शिवाजी महाराजांनी एकंदर ८ विवाह केले. या ८ राण्यांची नावे पुढील प्रमाणे आहे.  १) सगुणाबाई  २) सईबाई ३) सोयराबाई  ४) पुतळाबाई   ५) लक्ष्मीबाई  ६) सकवारबाई  ७) काशीबाई ८) गुणवंताबाई.  महाराजांना २ मुले होती १) संभाजी २) राजाराम. राज्यभिषेकाच्यावेळी महाराजच्या ४ राण्या ह्यात होत्या. संभाजी ची आई सईबाई तो केवळ अडीच वर्षाचा असताना मरण पावली. राज्याभिषेक होण्याप्रसंगी पट्टराणि होण्याचा मान सोयराबाई स मिळाला; परंतु युवराज होण्याचा मान संभाजी ला मिळाला. त्यातून रायगडावर तंटे बखेडे सुरू झाले.शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतर जवळजवळ १ महिन्यांनी राणी पुतळाबाई सती गेली. शिवाजी महाराजांना ६ मुली होत्या. या सर्व मुलींचे विवाह मानांकीत घराण्यातील पुरुषांशी झाले.परंतु शिवाजी महाराजांचा एकही जावई त्यांच्या स्वराज्य कार्यात सहभागी झालेला आढळून येत नाही. शिवाजी महाराजांची आई जिजाबई ही महाराजांच्या राज्याभिषेकापर्यन्त म्हणजे जून १६७४ पर्यंत हयात होत्या. आपल्या मुलाला सिंहासनावर बसल्याचे पाहून त्या माऊली च्या आनंदाला पारा...

जाणता राजा शिवाजी महाराज यांचे चित्रण

इमेज
                              जाणता राजा शिवाजी महाराज यांचे चित्रण                    १७  व्या शतकात जन्माला आलेले छत्रपती शिवराय हे चमत्कारिक पुरुष आहेत असे तत्कालीन समाजाला वाटले होते. याचा अर्थ असा की, चार मुस्लिम शाह्या भारतावर राज्य करीत आहेत. येथील चारही वर्णातील लोक या शाह्यांची नोकरी किंवा गुलामी करण्यात धन्यता मानत आहेत. याच नोकर्‍या मिळवण्यासाठी ते आपसात संघर्ष करीत. अनेक तुकड्यामध्ये या लोकांना विभागण्यात या मुस्लिम राज्यकर्त्यांना यश आले होते.  सर्वत्र हाहाकार माजला होता. शेतकर्‍याला दुष्काळणे आणि या राज्यकर्त्याणे छळल्यामुळे  शेतकर्‍यांची अवस्था अतिशय वाईट झाली होती.  स्त्री यांची सुरक्षा धोक्यात आली होती. धार्मिक जीवनात सर्वत्र अंधकार माजला होता. जबरदस्तीने धर्मांतर करवून आणले जात होते. मंदिरे पाडून त्या ठिकाणी मुस्लिम राज्यकर्ते मशिदी  बांधत होते. सातराव्या शतकाची सकाळ भगवंताची आरतीने होते नसून नमाजाच्या आवाजाणे होते होती. ...

" सुपर पिंक मून "

इमेज
 "  सुपर पिंक मून "  आज  दि. 26/04/2021 वार मंगळवार आकाशात एक विलोभनीय घटना पाहायला मिळणार आहे. यंदाची चैत्र पोर्णिमा ही सुपर मून पोर्णिमा असून वर्षातील पहिली सुपर मून पोर्णिमा असेल.  यावेळी चंद्र १०  टक्के मोठा व ३० टक्के तेजस्वी दिसेल. सुपर मून चे वैशिष्ट्य म्हणजे पोर्णिमा २७ तारखेला असेली तरी २६ ते २८  असे ३ दिवस चंद्र जवळजवळ पूर्ण दिसेल. चंद्र व पृथ्वी मधील अंतर ३,५८,६१५. कि.मी. असेल अशी माहिती खगोल अभ्यासक आणि स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली. प्रत्येक वर्षी सुपर मून च्या वेळेस चंद्र आणि पृथ्वी मधील अंतर कमी,अधिक होत असते. चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील हे कमीतकमी अंतर ३,५६,५००. कि.मी. तर दूरचे अंतर  ४,०६,७००. कि.मी. असते. यंदा हे सर्वात कमी अंतर २६. मे २०२१. रोजी असेल.  २६ जानेवारी १८४८ रोजी चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ होता.  नोव्हेंबर २०१६ ला तो पृथ्वीच्या खूप जवळ आला. २७ एप्रिल आणि २६ मे रोजी होणारे सुपर मून हेही खूप कमी अंतराचे असतील.  २७ एप्रिल आणि २६ मे २०२१ हे दोन जुळे सुपर मून आहेत. दोन्ही वेळेस चंद...

!! मनाचे श्लोक !! { Manche Shlok }

इमेज
               मनाचे श्लोक                  ( १ ) !! गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा  !! Ganadheesh Jo Eesh Sarva Gunaancha मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा  Mularambh Aarambh To Nirgunaacha नमूं शारदा मूळ चत्वार वाचा  Namu Sharada Mool Chatvar Vacha गमु पंथ आनंत या राघवाचा !! Gamu Panth Anant Ya Raghavacha !!                             ( २ ) !! मना सज्जना भक्तिपंथेचीं जावे  Mana Sajjna Bhakti Panthechi Jaave  तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे Tari Shree Hari Paavije To Swabhave  जनीं  निंध्य  ते सर्व सोडुनी द्यावे  Jani Nindhye Te Sarv Soduni Dyaave जनीं वंद्य ते सर्व भावे करावे !! Jani Vandya Te Sarv Bhave Karave !!             ( ३ ) !! प्रभाते मनीं  राम चिंतीत जावा  Prabhate Mani Raam Chinteet Jaava पुढे वैखरी राम आधी वदावा  Pudhe Vaikhari Raam Aadhi V...