अभ्यासक्रमाचे स्वरूप
अभ्यासक्रमाचे स्वरूप विद्यार्थ्यांमधील अपेक्षित वर्तनाबदलासाठी त्यांना अध्ययन अनुभव द्यावे लागतात. त्यासाठी शिक्षकाने शालेय व शाळाबाहेर मिळणारे अनुभव यांचा समायोजनासाठी तयार केलेली योजना म्हणजे अभ्यासक्रम. अभ्यासक्रम हे उद्दिष्ट्य प्राप्तीचे साधन आहे. अभ्यासक्रम संघटनात मानसशास्त्रीय व तर्कशास्त्रीय विचार महत्वाचे असतात.. प्रत्येक विषयांची रचना तर्कशुद्ध पणे झालेली आहे. विषयातील व्यापक नियम स्वरूपाचे नियम, व्याख्या मग त्याची उदाहरणे अशा शास्त्रीय मांडणीच्या स्वरूपात अभ्यासविषयक आला तर त्याचा व्यापविस्तार त्यातील घटक-उपघटकातील संबंध हे विद्यार्थ्यांना चांगले आणि लवकर समजतात. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना काही विषय वा ज्ञानशाखा शिकवायच्या असतात. .