पोस्ट्स

देशातील पहिले तरंगते टर्मिनल लेबलसह पोस्ट दाखवत आहे

देशातील पहिले तरंगते टर्मिनल.

  देशातील पहिले तरंगते टर्मिनल महाराष्ट्रात         प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राने सागरी क्षेत्रात ही आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले.          देशातील पहिले तरंगते टर्मिनल उभारण्याचा बहुमान महाराष्ट्र राज्याने पटकावला आहे.       द्रवरूप नैसर्गिक वायू चे देशातील पहिले तरंगते टर्मिनल जयगड बंदरात उभारण्यात आले असून , त्यातून वार्षिक ६ कोटी टन वायू उपलब्ध होऊ शकेल . इंधनातील नैसर्गिक वायूचे मिश्रण ६ टक्क्यावरून १५ टक्क्यांवर नेण्याचे केंद्र सरकार चे धोरण आहे . रत्नागिरीतील जयगड मध्ये तरंगते टर्मिनल उभारले आहे. क्षमता किती..? १.७० लाख घनमीटर या टर्मिनलची क्षमता आहे. ७५ कोटी घनफुट दररोज नैसर्गिक वायू तयार केला जाऊ शकतो . त्यानंतर हा घनरूप  वायू दाभोळच्या विशेष वाहिनीद्वारे  पुरवला जाईल. भारताचे नैसर्गिक वायूबाबतचे अवलंबित्व कमी होईल असा विश्वास आहे...