१६ मे दिनविशेष
१६ मे दिनविशेष १६ मे घटना १६ मे १९९३ बचेन्द्री पालच्या नेतृत्वाखलील पहिल्या महिला भारतीय मोहिमेने सात मुलींसह आठरा गिर्यारोहकांना एव्हरेस्ट पादाक्रांत करण्याचा मान मिळवून दिला व नवा जागतिक विक्रम केला. १६ मे १९९६ भारताचे १० वे पंतप्रधान म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांनी सूत्रे हाती घेतली. मात्र आवश्यक पाठींबा न मिळाल्यामुळे त्यांचे सरकार केवळ १३ दिवस टिकले. १६ मे २००० बॅंडमिंटन अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी या खेळातील गेम १५ ऐवजी ७ गुणांचा करण्याचा निर्णय अंतरराष्ट्रीय बॅंडमिंटन महासंघाच्या बैठक क्वालालंपूर येथील बैठकीत घेण्यात आला, मात्र २००६ मध्ये हा नियम परत बदलला गेला. १६ मे २००५ कुवैत मध्ये स्त्रियांना प्रथमच मतदानाचा हक्क देण्यात आला. १६ मे १९९२ स्पेस शटल एण्डेव्हरची प्रथम अंतराळयात्रा सफल झाली. १६ मे १९७५ जुन्को ताबेई एव्हरेस्ट्वर चढणारी प्रथम स्त्री ठरली. १६ मे १९७५ सिक्किम मधील जनतेने कौल दिल्यावर भारताने सिक्कीमला देशाचा भाग करून घेतले. १६ मे १९६९ सोव्हिएत संघाचे अंतराळयान व्हेनेरा ५ शुक्रावर उतरल...