लोकमान्य टिळक
लोकमान्य टिळक सण १९०८. 'केसरी' मधील टिळकांनी लिहिलेला लेखाविरुद्ध भरलेल्या देशद्राहीच्या खटल्याचा निकाल लागला. टिळकांनी ६ वर्षाचा कारावास आणि ९ हजार रुपयाचा दंड ठोठावण्यात आला. ज्या ९ न्यायालयीन पंचांच्या निवडीवर आधारित हा निकाल देण्यात आला त्यातील ७ युरोपियन पंचांनी टिळकांना दोषी ठरवलं तर २ भारतीय पंचांनी ते निर्दोष असल्याचं मत मांडले. टिळकांना म्यानमारमधील मंडाले येथील तुरुंगात ठेवण्यात आले. तेथे त्यांनी 'गीता रहस्य' हा ग्रंथ लिहिला. ६ वर्षांनंतर त्यांची मुक्तता झाल्यानंतर देशभर लोकांनी टिळकांचे उत्स्फुर्त स्वागत केले. या स्वागतातून लोकांनी त्यांना 'लोकमान्य' हि उपाधी दिली. " जर एक भारतीय मुख्य न्यायाधीश खुर्चीत विराजमान होत असेल तर ते लोकमान्य टिळकांनी सोसलेल्या अपार यातना आणि त्यांच्या बलिदानामुळे. "स्वत्रंत भारतात १९४८ साली मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाल्यावर न्यायमूर्ती एम. सी. छगला यांनी वरील उद्गार काढले होते. पुण्य...