सात लाखापर्यंत मिळवा अनुदान ड्रोन खरेदीसाठी
औरंगाबाद सोमवार दिनांक 30 जानेवारी 2023 लोकमत या पेपर मध्ये प्रकाशित झालेला लेख. कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, शेती व्यवसाय फायदेशीर करण्यासाठी शासन स्तरावर सतत प्रयत्न सुरू असतात. या अंतर्गत कृषी पदवीधारकांना अनुदानावर कीटकनाशक फवारणी ड्रोन उपलब्ध करण्याची योजना कृषी विभागाने आणली आहे. कृषी पदवीधर आणि शासनाच्या कृषी संस्थांना हे ड्रोन दिले जात आहे. शेतकऱ्यांनी या ड्रोन चा वापर केल्यास कमी वेळेत जास्त क्षेत्रावर फवारणी शक्य आहे. शिवाय यासोबत विषबाधेचा धोकाही घटतो. ड्रोनसाठी अनुदान पिकावर कीटकनाशक फवारणीसाठी अत्याधुनिक ड्रोनचा वापर केल्यास कमी कालावधीत आणि कोणताही धोका न होता फवारणी शक्य आहे. ड्रोनची बाजारातील किंमत शेतकऱ्यांना परवडत नाही. ही बाब लक्षात घेऊन कृषी पदवीधारकांना एक उपजीविकेचे साधन या निमित्ताने उपलब्ध करण्याच्या उद्देशाने कृषी पदवीधरांना ड्रोन खरेदीसाठी सात लाखापर्यंत अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कोणाला घेता येणार कृषी फवारणीचा ड्रोन कृषी पदवीधर आणि शासनाच्या कृषी विज्ञान संस्था, कृषी उत्पादक कंपनी, कृषी सह सेवा संस्था, कृषी अवजारे ...