मुला मुलींचा बाजार
मुला मुलींच्या बाजार.. .......,.......... थोडस अवघड पण आणि सोप्प पण ओळख निर्माण करण्याच्या नादात आपण स्वतः ची ओळख विसरत चाललो आहे. माझं करिअर घडवायचं आहे. असं म्हणून आपण वेळेला दूर सरतो, आणि कालांतराने वेळ आपल्याला दूर सारते. हे निर्विवाद पणे सत्य आहे. मी एका ठिकाणी वेळ घालावा म्हणून बसलो होतो. त्या ठिकाणी एक 40-50 शीची व्यक्ती बसलेली होती आणि ती व्यक्ती वधू वर मेळावा मधील व्हिडिओ बघत होते. मी ही सुरवातीला दुर्लक्ष केले नंतर थोड काळजी पूर्वक लक्ष केंद्रित करून ते ऐकण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या लक्षात आले.की माणूस आज रोजी बाजारात भाजी पाला विकावा तश्या प्रकारे त्या व्हिडिओ मुली व मुलानं बद्दल माहिती सांगितली जात होती. सरासरी 25ते 30 वयोवर्ष असलेल्या मुली योग्य स्थळ मिळावे म्हणून आपला स्वतः चा परिचय करून देत होत्या काही पालक ही आपल्या मुलांची ओळख सांगत होते काही आपल्या अपेक्षा सांगत होत्या या सगळ्या वरून एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे ........ आपण वेळेला महत्व नाही दिले तर वेळ आपल्याला महत्व नाही देत. योग्य वेळेत कमी अपेक्षा ठेऊन नातेसंबंधात लग्न जुळवली असतो तर कदाची...