परिभाषा : तंत्र , स्वरूप, उपयोजन..
परिभाषा : तंत्र , स्वरूप, उपयोजन..
परिभाषाची व्याख्या, स्वरूप, वैशिष्ट्ये खलील प्रकारे स्पष्ट करता येईल.
भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या ' शासन व्यवहारात मराठी' या पुस्तकातील परिभाषा ची
व्याख्या :- " एखाद्या विशेष ज्ञानाच्या क्षेत्रात निच्छित व एकाच आर्थि प्रयुक्त होणारा व व्याख्येचा द्वारा व्यक्त होऊ शकणारा कल्पनेचे धनिरुप प्रतीक असणारा शब्द म्हणजे पारिभाषिक शब्द होय.
चेम्बर्स टेक्निकल डिक्शनरी या ग्रंथातील व्याख्या:-
पारिभाषिक शब्द हे विशिष्ट विषयातील तज्ञ अथवा तंत्रज्ञ नव्याने तयार करतात, दुसर्या भाषेतून येतात वा अन्य विषयांतील किंवा क्षेत्रांतील परिभाषेतून ग्रहण करतात किंवा दुसर्या भाषेतील शब्द त्यातील कल्पनेसहीत आपल्या भाषेशी जुळता करून घेतात.
विष्णुशास्त्री चिपळूणकर
प्रत्येक शास्त्राला त्याचे त्याचे असे ठरलेले काही शब्द असतात. त्यास संस्कृतात परिभाषा म्हणतात.
असे जे नवे शब्द बनवायचे त्यात इतके गुण असावे लागतात. एक तर या शब्दांचे वरचेवर काम लागणार, तेव्हा ते लांबलचक अवजड नसावेत, तर जेवढे थोडक्यात येतील तेवढे चांगले. दुसरे ते धोबड अथवा कर्कश नसून, काणास चांगले मृदु व मधुर लागावे..
परिभाषेची वैशिष्ठ्ये
शासन व्यवहारात मराठी या ग्रंथात परिभाषेची वैशिष्ठ्ये संगीतलेली आहेत.
१) एकार्थता
आशय वा अर्थ निच्छितपणे व्यक्ति करणे हे परिभाषेचे उद्दिष्ट्ये असते: मात्र त्या शब्दातून सूचित होणारा अर्थ हा एकच असला पाहिजे. सामन्य शब्दप्रमाणे पारिभाषिक शब्द अनेकार्थी वा संदर्भानुसार अर्थ प्रकट करणारा असून चालत नाही. तर शास्त्रीय स्वरूपाच्या भाषेत यथार्थता येण्याच्या दृष्टीने परिभाषेत एका शब्दाला एकच अर्थ असावा.
2) स्पष्टर्थता
पारिभाषिक शब्दाचा अर्थ निच्छित असावा. तसा तो ज्या वस्तूचा, विचाराचा वाचक असेल त्याची स्पष्ट कल्पना देणारा असावा. शास्त्रीय विषयात प्रत्येक गोष्टीचा सूक्ष्म विचार असतो. एक कल्पना दुसरीशी सदृश असते. अर्थाच्या दृष्टीने अतिनिकट असते.अशा वेळी प्रत्येक कल्पनेची सूक्ष्मता प्रत्येकाची वेगळी अर्थछटा व्यक्त होईल. असा स्पष्टर्थक शब्द ठरविणे जरूर असते. तेव्हा एकार्थक असला आणि त्याच्याच जोडीला तो स्पष्टार्थक असला म्हणजे आशयाबाबत कुठलीही संदिग्धता राहत नाही.
3) एकरूपता
शास्त्रीय क्षेत्रात वा अन्य ज्ञान क्षेत्रात परस्परांशी संबंध असे अनेक विषय समाविष्ट असतात. एका विषयातील कल्पना वा संकल्पना दुसर्या विषयात तशीच संदर्भानुरोधाने येणे शक्य असते. अशावेळी त्या त्या ज्ञानक्षेत्रात विवक्षित कल्पनेत फरक नसेल तर दोन्हीकडील परिभाषा एकरूप असणे केव्हाही योग्य ठरते. अशावेळी समान कल्पांनाच्या संदर्भात, तिच्या अभिव्यक्तीत विसंवाद आढळत नाही.
4) सघनता
पारिभाषिक शब्द हे आटोपशीर असावेत. साहित्य व्यावहारिक भाषेप्रमाणे वर्णनात्मकता, पाल्हाळ यांना येथे स्थान नसावे. स्पष्टीकरणात्मक मांडणीपेक्षा येथे तिच्या वाच्यार्थाला महत्व असते. त्यामुळे या शब्दांत सधनता असावी.
5) अल्पाक्षरत्व
सघनता हे पारिभाषिक शब्दांचे आशयासंबंधीचे लक्षण म्हणून उल्लेखित आहे. तर अल्पाक्षरत्व हे त्या शब्दांच्या अभिव्यक्तीचे लक्षण म्हणून सांगता येईल. या शब्दांचा लेखनात सातत्याने वापर होत असल्यामुळे ते अल्पाक्षरी असणे गरजेचे ठरते.
6) सातत्य
कधी कधी दीर्घकाळ प्रयोगाने स्थिरवलेल्या व परंपरेने मान्य केलेल्या रूढ शब्दांचा स्वीकार करणे गरजेचे ठरते. त्यामुळे नवी व जुनी भाषिक परंपरा यात समन्वय साधला जातो. केवळ नवीन परिभाषा निर्माण करत बसलो, तर त्या भाषेतील ज्ञान परंपरा, तिचे संचित हे खंडित होईल आणि नवी परिभाषा देखील लोकजीवनात रूळणे कठीण होईल. त्या दृष्टीने नव्या व जुन्याचा सांधा जोडून सातत्य टिकविणे म्हत्वाचे ठरते.
7) संगती
पारिभाषिक शब्दांचा केवळ सुट्या स्वरुपात विचार करून चालत नाही. एखाद्या शब्दाचा अर्थ ठरवतांना त्यांच्या सजातीय वा समानार्थक शब्दांची देखील अर्थ निच्छिती करावी लागते. पारिभाषिक संज्ञांचे असे कुल निच्छित करतांना भिन्न भिन्न अर्थच्छ्टा नेमकेपणाने दाखवाव्या लागतात. तेव्हा त्या कुलाची संगती लक्षात घेणे गरजेचे ठरते.
8) शब्दसौष्ठव
पारिभाषिक शब्द हे नित्य वाचले जात असल्यामुळे ते उच्चारसुलभ असावेत. त्यात सौष्ठव, माधुर्य, श्रवण सुलभता असली तर उत्तमच; परंतु या बाबी नसतील, तर असे शब्द किमान कठोर, खडबडीत, कर्णकटू नसावेत..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा