महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाण यांनी आकाशवाणी च्या मुंबई केंद्रावरून दिलेले भाषण.

 महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाण यांनी आकाशवाणी च्या मुंबई केंद्रावरून दिलेले भाषण. 

 ग्रामीण शिक्षणाची माझी कल्पना:

ग्रामीण शिक्षणाची माझी कल्पना मी आज आपणापुढे सांगावी अशी अपेक्षा आहे. परंतु ग्रामीण शिक्षणासंबंधी ची माझी कल्पना सांगण्यापूर्वी, शिक्षण म्हणजे काय याची थोडीफार कल्पना आपण समजून घेवूया. पुस्तक वाचून येणारे ज्ञान ते शिक्षण असे समजण्याची एक मोठी प्रथा आहे. आणि काही अंशी बरोबर आहे. परंतु खरे शिक्षण म्हणजे काय याचा अर्थ आपण सगळ्यांनी आपल्या मनाशी समजावून घेतला पाहिजे. मी माझ्या उपयोगासाठी शिक्षणाची एक सरळ आणि साधी व्याख्या करून ठेवली आहे. शिक्षित व्यक्तिला स्वतः च्या भोवती घडणार्‍या गोष्टी आणि जगामध्ये घडणार्‍या इतर गोष्टी यांची ज्यामुळे काही संगती लावता येते, त्याचा योग्य अर्थ समजावून घेता येतो, आणि त्यांचा परिणाम आपल्या जीवनावर काय घडतो. आपल्या व्यक्तिमहत्वावर काय घडतो हे समजावून घेता येते आणि समजावून देता येते, त्याला मी शिक्षण मानत आलो आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट मला आपल्या नजरेत आणावयाला पाहिजे ती अशी की जेव्हा ग्रामीण शिक्षण असा शब्द आही उच्चारतो तेव्हा ग्रामीण शिक्षण नागरी शिक्षण, खेड्यांतल्या  लोकांच्यासाठी शिक्षण शहरांतल्या लोकांच्यासाठी शिक्षण असे शिक्षणाचे वेगवेगळे प्रकार असावेत असा विचार साहजिक मनाशी येतो. तेव्हा या बाबतीत वस्तुस्थिती काय आहे याची अगदी स्पष्ट कल्पना आपल्याला असली पाहिजे.

       माझी असे स्पष्ट आणि स्वच्छ मत आहे की शिक्षणाचे असे दोन मूलभूत वेगवेगळे प्रकार असूच शकणार नाही. आजच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत खेड्यांतला माणूस आणि शहरांतला माणूस यांच्यामध्ये एक प्रकारचे जे कृत्रिम अंतर वाढत चालले आहे ते वाढते अंतर कमी करून त्यांच्यामध्ये एक प्रकारचा टोल निर्माण  करणे, जवळचा संबंध निर्माण करणे, जिव्हाळा निर्माण करणे हा माझ्या दृष्टीने आपल्या देशांतील आजचा अत्यंत महत्वाचा आणि प्रमुख असा प्रश्न आहे आणि म्हणून ग्रामीण शिक्षण हा काही वेगळा प्रकार आहे अशा समजुतीने   जर आम्ही ग्रामीण शिक्षणाकडे पाहत असलो, तर ती एक आपली मोठी चूक होईलसे मला सांगावेसे वाटते.    

          आज ज्या तर्‍हेने शिक्षण आपल्या आवतीभोवती दिले जाते त्याचा ग्रामीण जीवनावर काय परिणाम होतो?

   नमुन्यासाठी खेडेगावांतला एक मुलगा बाहेरगावी शिक्षणासाठी गेला आहे अशी आपण कल्पना करू या. त्या शिक्षणाचा त्याच्यावर काय परिणाम घडला, आणि तो ज्या खेड्यांतून आला त्या खेड्यासाठी त्याचा काय उपयोग  झाला याचा आपण विचार केला तर मात्र मनामध्ये एक प्रकारची खिन्नता आल्याशिवाय राहत नाही. खेड्यांत बाप आणि आई यांनी कष्ट सहन करून शिक्षणासाठी बाहेर पाठविलेला मुलगा पदवी घेवून जेव्हा शहाणा होतो तेव्हा ते त्याचे शहाणपण खेड्यांमध्ये राहून शेती करणार्‍या किंवा दूसरा काही उद्योग करणार्‍या त्याच्या माता पित्यांचे आर्थिक जीवन सुधारण्यास उपयोगी पडत नाही. ............................  ............................

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अभ्यासक्रम म्हणजे काय सांगून त्याचे स्वरूप , रचना निकष आणि तत्वे ...

अभ्यासक्रम रचनेची विविध पद्धती स्पष्ट करा.

अभ्यासक्रमाचे स्वरूप