लोकमान्य टिळक
लोकमान्य टिळक
सण १९०८. 'केसरी' मधील टिळकांनी लिहिलेला लेखाविरुद्ध भरलेल्या देशद्राहीच्या खटल्याचा निकाल लागला. टिळकांनी ६ वर्षाचा कारावास आणि ९ हजार रुपयाचा दंड ठोठावण्यात आला. ज्या ९ न्यायालयीन पंचांच्या निवडीवर आधारित हा निकाल देण्यात आला त्यातील ७ युरोपियन पंचांनी टिळकांना दोषी ठरवलं तर २ भारतीय पंचांनी ते निर्दोष असल्याचं मत मांडले. टिळकांना म्यानमारमधील मंडाले येथील तुरुंगात ठेवण्यात आले. तेथे त्यांनी 'गीता रहस्य' हा ग्रंथ लिहिला. ६ वर्षांनंतर त्यांची मुक्तता झाल्यानंतर देशभर लोकांनी टिळकांचे उत्स्फुर्त स्वागत केले. या स्वागतातून लोकांनी त्यांना 'लोकमान्य' हि उपाधी दिली.
" जर एक भारतीय मुख्य न्यायाधीश खुर्चीत विराजमान होत असेल तर ते लोकमान्य टिळकांनी सोसलेल्या अपार यातना आणि त्यांच्या बलिदानामुळे. "स्वत्रंत भारतात १९४८ साली मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाल्यावर न्यायमूर्ती एम. सी. छगला यांनी वरील उद्गार काढले होते.
पुण्याच्या डेक्कन कॉलेजातून बी.ए. गणित विषयात उत्तीर्ण झाल्यावर टिळकांनी एम.ए. शिक्षण मध्येच सोडून कायद्याची पदवी संपादित केली. देशात ब्रिटिश सत्तेचा वारू चौखुर उधळत होता. तेव्हा भारतीय सामान्यजन अन्याय, अत्याचार दडपशाहीखाली भरडून निघत होते. संबंध देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीत खितपत असल्याच्या विचाराने टिळकांच्या मनात अस्वस्थता वाढत होती. एका बाजूला शिक्षण प्रसाराने लोकांच्यात स्वराज्याबाबत सजगता निर्माण होईल असे वाटून न्यू इंग्लिश स्कुल, डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापन केली. तर दुसरीकडे यापेक्षाही व्यापक जनजागृती करण्यासाठी 'केसरी' , 'मराठा' यांसारखी वृत्तपत्रे सुरु केली. स्वराज्याच्या कल्पनेने त्यांच्या मनात ठाण मांडले होते. या वृत्तपत्रांतून इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी आपली संपादकीय कारकिर्दी पणाला लावली. सरकारच्या दडपशाही विरुद्ध जहालपणे लिहिण्यामुळेच त्यांना कारावास हि सोसावा लागला. यामुळे ब्रिटिश पत्रकार, लेखक व्हेलेंटाईन शिरोल यांनी लोकमान्य टिळकांना त्याच्या 'भारतीय असंतोष' (१९१०) या पुस्तकात ' भारतीय असंतोषाचे जनक' म्हंटल्याने हे विधान प्रसिद्ध झाले. १८८६ मधील दुष्काळात शेतकऱ्यांकडून सारा गोळा करण्यास विरोध करून आंदोलन छेडले. या काळात टिळकांनी शेतकरी व कष्टकरी जनतेला संघटित करून ' दुष्काळ साहाय्यता कायद्या ' प्रमाणे दुष्काळपीडित शेतकऱयांना साहाय्य करण्यासाठी सरकारवर दबाव आणला.
तिकडे लार्ड कर्झन बंगालच्या फाळणीचा घाट घातल्याने लोकमान्य टिळक, लाला लजपत राय व बिपीनचंद्र पाल यांनी आंदोलन उभारले. सरकारच्या या कुटील कुत्याविरुद्ध देशभर असंतोष पसरविण्यात या तिघांना यश आले. यामुळेच त्यांना 'लाल, बाल, पाल' असे गौरवपूर्ण संबोधन प्राप्त झाले. शिवजयंती व गणेशेत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यासाठी चालना देणाऱ्या लोकमान्यांचा लोकसंग्रह अफाट वाढत गेला. दीड वर्ष्याच्या तसेच सहा वर्ष्याच्या तुरुंवासाने राष्ट्रीय पातळीवर एक निडर , झुंझार , स्वातंत्र्य सेनांनी म्हणून टिळकांची ओळख निर्माण झाली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा