अभ्यासक्रम रचनेची विविध पद्धती स्पष्ट करा.

                        अभ्यासक्रम रचनेची विविध पद्धती स्पष्ट करा
-.  उत्तर - अभ्यासक्रमात त्या इयत्तेला असणाऱ्या सर्व  विषयांचा समावेश होतो. अभ्यासक्रम हि संपूर्ण योजना असते तर पाठ्यक्रम हा त्यातील एक भाग असतो. पाठ्यक्रम म्हणजे विशिष्ट इयत्तेसाठी विशिष्ट विषयाची अध्ययन अध्यापन योजना होय. अभ्यासक्रमांने ठरवून दिलेली निश्चित उद्दिष्ट्य गाठण्यासाठी पाठ्यक्रमाचा उपयोग करावा लागतो.
          इतिहास या विषयाची व्याप्ती फार मिठी आहे. अनेक ऐतिहासिक व्यक्ती, त्यांचे कर्तृत्व, विविध साम्राज्य, त्यांची कारकिर्दी, लोकांचे सामाजिक, आर्थिक, सामाजिक व धार्मिक जीवन याचा इतिहासात समावेश होतो. तसेच मानव निर्मितीपासून तर आजपर्यंतचा काळ इतिहासात जमा होतो. इतिहासाची हि फार मिठी व्याप्ती लक्षात घेता हा इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडायचा कसा ? याची रचना कशी करायची ? हा एक फार मोठा प्रश्न असतो. निरनिराळ्या शिक्षणतज्ञांनी अभ्यासक्रम रचनेच्या सुचविलेल्या पद्धती पुढीलप्रमाणे
:-
 कालक्रम पद्धती
       कालक्रम पद्धतीचे जनक डॉ. लॉरी हे आहेत. या पद्धतीत कालाच्या क्रमाला महत्वाचे स्थान आहे. अतिप्राचीन काळापासून इतिहास जसा -जसा घडत गेला तस -तसा तो निरनिराळ्या कालखंडात विभाजित करून विद्यार्थ्यांना शिकवायचा. अतिप्राचीन, प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक अशा काळात इतिहासाची विभागणी केली जाते. हि पद्धती रूसोच्या निसर्गक्रमानुसार शिक्षण या सिद्धांतावर आधारित आहे. इतिहासाचे तीन कालखंड धरले जातात. प्राचीन इतिहास यात मोहंजोदारो, हडप्पा संस्कृती, आर्याचे आगमन यांचा समावेश होतो. मध्ययुगीन इतिहासात राजपूत, मोगल, मराठे, यांचा तर आधुनिक इतिहासात ब्रिटिशकालीन, भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास याचा समावेश होतो.
          जसा इतिहास घडला तसाच शिकविणे म्हणजे कालक्रम होय. या पद्धतीप्रमाणे प्राचीन कालखंड एका इयत्तेत शिकवायचा तर मध्ययुगीन कालखंड दुसऱ्या इयत्तेत शिकवायचा. एका शतकातील अभ्यास पूर्ण झाल्यावर दुसऱ्या शतकाकडे वळायचे. एखादी घटना, एखादी चळवळ, रूढी, एखादी संस्था आजच्या अवस्थेला कोणत्या प्रकारे पोहोचली हे या पद्धतीमुळे समजते. या पद्धतीप्रमाणे जर आपण मोगल काळ वर्ग आठवी ला शिकविला तर ब्रिटिश काळ नववीला शिकवावा लागेल तर दहावीला आधुनिक भारताचा इतिहास शिकवावा लागेल.
      या पद्धतीचा उपयोग करतांना प्रत्येक काळाची प्रमुख विशेषतः अभ्यासक्रमात आली कि नाही  हे पाहावे लागेल. प्रत्येक काळात काही विशिष्ट समस्या असतात, त्या समस्यां कोणत्या हर माहित झाले पाहिजे. मोगल काळात मराठ्यांची समस्या होती. स्वराज्य प्राप्ती, तर ब्रिटिश काळात समस्या होती स्वातंत्र प्रत्येक काळात असणाऱ्या महान विभूती व त्यांच्या तत्वज्ञानाची, आदर्शाची ओळख विद्यार्थ्यांना व्हयाला पाहिजे.
      इतिहास शिक्षणाचा प्रमुख हेतू हा विद्यार्थ्यांना कालक्रमाचे ज्ञान देणे हा होय,,,,.......  

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अभ्यासक्रम म्हणजे काय सांगून त्याचे स्वरूप , रचना निकष आणि तत्वे ...

अभ्यासक्रमाचे स्वरूप