वाहणावरील कर्जाचा बोजा घरात बसूनच करा रद्द.
कर्ज घेऊन वाहन खरेदी केल्यानंतर बँकेचे कर्ज भरल्यानंतर वाहनावर असलेला कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी वाहन मालकाला आरटीओ कार्यालय आणि बँकांच्या चकरा माराव्या लागतात. मात्र आता राज्याच्या परिवहन आयुक्त कार्यालयाने कर्जाचा बोजा उतरवण्यासाठी 'फेसलेस' सेवा सुरू करण्याचे आदेश आरटीओ कार्यालयांना दिले आहेत. त्यामुळे आता नागरिकांना घरबसल्या वाहनावरील कर्जाचा बोजा कमी करता येणार आहे.
आरटीओ कार्यालयात गेल्याशिवाय कोणतेही काम होत नाही, असाच अनेक वर्ष वाहनधारक लोकांचा अनुभव होता, मात्र आता ऑनलाईन पद्धतीने आरटीओ कार्यालयात न जाता ही वाहना संबंधी विविध कामे फेसलेस सेवेच्या माध्यमातून करणे शक्य होत आहे.
वाहनावर असलेला कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी आतापर्यंत ऑनलाईन प्रणाली होती. परंतु त्यासाठी अर्ज करून बँकेकडे जाऊन त्यावर सह्या घेऊन शुल्क भरून आरटीओ कार्यालयात कागदपत्रे जमा करावे लागत होती. त्यानंतर वाहन मालकाला नवीन प्रमाणपत्र टपाल कार्यालयामार्फत पाठवले जाते होते. आता केंद्र सरकारच्या आदेशानंतर ही सेवा आधार क्रमांकाच्या आधारे 'फेसलेस' देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
* ऑनलाइन अर्ज कसा कराल?
अर्जदाराला ऑनलाईन अर्ज करताना अगोदर ऑनलाईन नोंदणी करावी लागते. त्यानंतर मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी त्या ठिकाणी टाकल्यानंतर वाहन मालकाचे नाव व रेकॉर्डवर असलेले नाव याची खातरजमा केली जाईल.
त्यानंतर नमुना 35 व इतर कागदपत्रे अपलोड करावी लागणार अर्जदाराला नमुना 35 व इतर कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. आधार क्रमांकाचा वापर करून अर्ज केल्यास कागदपत्रे सादर करण्यासाठी प्रत्यक्ष जावे लागणार नाही. त्यानंतर आरटीओ कार्यालय 'फेसलेस' पद्धतीने आलेला अर्ज व बँकेकडून आलेली माहिती तपासून घेतील.
दोन दिवसात अर्ज निकाली निघणार?
फेसलेस पद्धतीने आलेले अर्ज दोन दिवसांमध्ये निकाली काढण्याची सूचना परिवहन आयुक्त कार्यालयाने केली आहे. त्यामुळे वाहनधारकांचे अर्ज दोन दिवसात निकाली निघतील यावर भर दिला जात आहे.
या सेवाही मिळतात ऑनलाईन
आरटीओ कार्यालयातील अनेक सेवा ऑनलाईन झालेले आहेत. अगदी लर्निंग लायसन्स काढण्यासह लायसन्स चे नूतनीकरण ही आता ऑनलाईन पद्धतीने अगदी घरी बसूनही करता येत आहेत. दुय्यम नोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्ज, प्रमाणपत्र, ना हरकत प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्र वरील पत्त्यातील बदल, वाहनावरील पत्त्यात बदल आणि वाहन चालक प्रमाणाचे नूतनीकरण आणि वाहन चालू परवान्याचे नूतनीकरण आधी सेवा ऑनलाईन आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा