सात लाखापर्यंत मिळवा अनुदान ड्रोन खरेदीसाठी
औरंगाबाद सोमवार दिनांक 30 जानेवारी 2023 लोकमत या पेपर मध्ये प्रकाशित झालेला लेख.
कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, शेती व्यवसाय फायदेशीर करण्यासाठी शासन स्तरावर सतत प्रयत्न सुरू असतात. या अंतर्गत कृषी पदवीधारकांना अनुदानावर कीटकनाशक फवारणी ड्रोन उपलब्ध करण्याची योजना कृषी विभागाने आणली आहे. कृषी पदवीधर आणि शासनाच्या कृषी संस्थांना हे ड्रोन दिले जात आहे. शेतकऱ्यांनी या ड्रोन चा वापर केल्यास कमी वेळेत जास्त क्षेत्रावर फवारणी शक्य आहे. शिवाय यासोबत विषबाधेचा धोकाही घटतो.
ड्रोनसाठी अनुदान
पिकावर कीटकनाशक फवारणीसाठी अत्याधुनिक ड्रोनचा वापर केल्यास कमी कालावधीत आणि कोणताही धोका न होता फवारणी शक्य आहे.
ड्रोनची बाजारातील किंमत शेतकऱ्यांना परवडत नाही.
ही बाब लक्षात घेऊन कृषी पदवीधारकांना एक उपजीविकेचे साधन या निमित्ताने उपलब्ध करण्याच्या उद्देशाने कृषी पदवीधरांना ड्रोन खरेदीसाठी सात लाखापर्यंत अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
कोणाला घेता येणार कृषी फवारणीचा ड्रोन
कृषी पदवीधर आणि शासनाच्या कृषी विज्ञान संस्था, कृषी उत्पादक कंपनी, कृषी सह सेवा संस्था, कृषी अवजारे बँक, कृषी संस्थानात ड्रोन खरेदीसाठी १००% टक्के अनुदान देण्यात येते. अनुदान केंद्र सरकारकडून देण्यात येणार आहे.
औषध फवारणीचा ड्रोन घेतल्यानंतर होणारे फायदे
पिकावरील कीटकनाशक फवारणीसाठी ड्रोन चा वापर केल्यास पाणी औषध आणि वेळेची बचत होते. कमी पाण्यात जास्तीत जास्त क्षेत्रावर आणि कमी वेळेत ही फवारणी ड्रोन करू शकतो.
विषबाधेचाही धोका नाही
कीटकनाशक फवारणी करताना शेतकऱ्यांना विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू होण्याच्या घटना दरवर्षी घडतात. हा धोका टाळण्यासाठी पिकांवर ड्रोन द्वारे कीटकनाशक औषधाची फवारणी करावी अशी शिफारस कृषी विभागातील तज्ञांनी केली आहे. याचाच एक भाग म्हणून शासनाने कृषी क्षेत्रात ड्रोन चा वापर वाढावा यासाठी अनुदानाची योजना आणली आहे.
आणि यातून रोजगाराची संधी निर्माण होते.
कृषी पदवीधर, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी अवजारे बँक, शासन कृषी महाविद्यालयास १००% टक्के अनुदान आहे. आधुनिक यंत्राने शेतकऱ्यांना दिलासा व कृषी पदवीधरांना रोजगार देण्याचा शासनाचा मानस आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा