इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिट कसे मिळवायचे.

आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिट आयडीपी असेल तर जगभरातील विविध देशांमध्ये कायदेशीर रित्या वाहन चालवण्याची परवानगी मिळते. विदेशातील ट्रिपदरम्यान अनेक जण बस टॅक्सी या सार्वजनिक वाहतुकीऐवजी बाईक आणि कारणे तेथील रस्त्यावर फिरणे पसंत करतात. भारतात आयडीपी कसा मिळवावा याबाबत जाणून घेऊया.

त्यासाठी काय पात्रता लागते.
भारतात आयडीपी साठी पात्र होण्यासाठी तुमचे वय 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे व तुमच्याकडे वैद्य भारतीय चालक परवाना असणे आवश्यक आहे. 
त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे.
तुम्हाला ओळखीचा पुरावा द्यावा लागेल.
तुम्ही राहत असलेल्या पत्त्याचा पुरावा द्यावा लागेल.
पासपोर्ट आकाराची दोन छायाचित्र,
तुमचा सध्याचा ड्रायव्हिंग चा परवाना द्यावे लागेल.
अर्ज कुठून करायचा.
कोणत्याही अधिकृत प्रादेशिक परिवहन कार्यालयात आरटीओ किंवा ऑनलाईन आयडीपी अर्ज मिळवता येतो, यासाठी सध्या एक हजार रुपये फी आहे. जी अर्जावेळी भरावी लागते.

भारतात आयडीपी जारी होण्यासाठी साधारणपणे एक आठवडा लागतो.
तुम्हाला आयडीपी मेल द्वारे किंवा आरटीओ मधून वैयक्तिकरित्या ही मिळवता येईल.
विदेशात वाहन चालवताना आयडीपी सोबत वैध भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स ही जवळ ठेवा.
तुम्ही ज्या देशात आहात त्या देशातील स्थानिक रहदारी कायदे आणि नियमांचे परिचित असल्याची खात्री करा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अभ्यासक्रम म्हणजे काय सांगून त्याचे स्वरूप , रचना निकष आणि तत्वे ...

अभ्यासक्रम रचनेची विविध पद्धती स्पष्ट करा.

अभ्यासक्रमाचे स्वरूप