मी नास्तिक
आपण चमत्कार मनात नाही, आपला विश्वास विज्ञानावर्ती "बाप दाखव नाही तर श्राध्द घाल" असे आपले विचार मंग आपण कशाला विश्वास ठेवू चमत्कारावर्ती. आज आपण विचार करतो की खरंच त्या काळी चमत्कार वगैरे घडत होते का? असा आपण विचार करतो. पण जर विज्ञान युगामध्ये विज्ञानात वैज्ञानिक योग्य गणित पद्धत वापरून एखाद्या प्रयोग करू शकतात आणि ते तंतोतंत योग्य कार्य करत असेल तर आपण त्यावरती विश्वास ठेवतो. म्हणजे समजा विज्ञानाने मोबाईल विकसित केला आणि त्याहून हे लक्षात आलं की आपण कोसो मैल दूर असलेला आपल्या प्रिय व्यक्तीशी आपण फोनवरती बोलू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ एखादी व्यक्ती शंभर किलोमीटर अंतरावरती आहे आणि ती आपल्याला त्या ठिकाणाहून बोलत आहे त्या गोष्टीवरती आपला विश्वास आहे कारण त्याचा अनुभव आपण स्वतः आपल्या स्वतःच्या कानाने घेत आहोत. त्यामुळे आपण शंभर टक्के खात्री करून सांगू शकतो कि ती व्यक्ती शंभर किलोमीटर वरती आहे व ती आपल्याशी बोलत आहे हेच जर आयुर्वेदात सांगायचं झालं किंवा प्राचीन काळात घडलेल्या गोष्टी आहेत त्याबद्दल सांगायचं झालं तर आपला विश्वास त्यावरती बसत नाही म्हणजेच एखाद्याच्या मनात काय चाललंय हे ओळखायला आपल्याला सध्याचे विज्ञान तंतोतंत माहिती देऊ शकतो पण आपण हे मान्य करायला तयार नाहीत की प्राचीन काळात अशा गोष्टी अगोदरच अवगत होत्या. म्हणजे एखादी व्यक्ती शंभर किलोमीटर अंतरावर ती असेल तरीही व्यक्ती एकमेकांच्या संपर्कात राहत असे फक्त आपण त्यावरती विश्वास ठेवत नाही कारण त्याचे कोणतेही पुरावे आपल्याला मिळत नाहीत फक्त कोणीतरी एखाद्या पुस्तकात एखाद्या ग्रंथात लिहून ठेवलेल आहे. म्हणून आपण त्यावरती विश्वास ठेवू शकत नाही, पण वास्तविक पाहता जर विज्ञान हाच प्रगती करू शकतो. तर त्याकाळी त्याची प्रगती झालेली नसेल हे कशावरून विज्ञानाला आज जगात कित्येक तरी रोग आहेत ज्या वरती औषध सापडलेले नाही. पण प्राचीन काळात लिहिला गेला ग्रंथ आयुर्वेद या ग्रंथामध्ये प्रत्येक रोगावर ती उपयोगी पडणाऱ्या औषधाची माहिती आहे संस्कृतमध्ये लिहिल्या गेलेले माहिती जर आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला समजेल की ज्या गोष्टीचा शोध आपण आज घेतोय. त्या गोष्टीचा शोध अगोदरच्या काळात लागलेला आहे समजा आपल्याला पुराव्यांशी सिद्ध करायचं झालं तर विमानाचा शोध हा आधुनिक युगात लागला असं आपण समजू शकतो. आणि जर त्याला प्राचीन काळात समजून घ्यायचं झालं तर ग्रंथात लिहिल्याप्रमाणे अगोदरचे सज्जन व्यक्ती किंवा ज्यांना आपण देव असं संबोधतो ते विमानाने प्रवास करायचे फक्त त्यांच्या विमानाची डिझाईन वेगळी असेल ती एक आपल्याला सिरीयल मध्ये बघितल्यामुळे काल्पनिक असल्यासारखा वाटेल पण वास्तविक पाहता त्याकाळी ही विमान होतेच तेही विमानाचा वापर करायचे तर रामायणाचे जर आपण उदाहरण घेतलं. तर ते सगळ्यांना सहज सोप्या पद्धतीत समजेल ते असे की रावणाने सीताचे अपहरण हे विमानाद्वारे केलेले आहे. कारण की भारतामधून श्रीलंकेत जाणारा किंवा जाण्यासाठी कोणताही रस्ता त्याकाळी अवगत नव्हता. त्याकाळी समुद्रामधून रस्ता काढायचा झाल्यास एकतर जहाज किंवा वायू मार्गाने प्रवास करणे. आता आपण त्यावरती विश्वास ठेवत नाही. आपण तरीही गोष्टीवरती विश्वास ठेवायला तयार नाही. त्याकाळी जो समुद्रात रस्ता तयार केला गेला तो मानवनिर्मित आहे. "कोणीतरी पाण्यात दगड टाकायचा आणि तो पाण्यावरती तरंगणार आणि त्यावरून मनुष्य या ठिकाणाहून त्या ठिकाणी चालत जाणार" हेही आपल्या बुद्धीच्या आकलना पलीकडे आहे. पण आज जर आपण म्हणलं की माणसाला हवेच्या प्रेशर वरती हवेत उडता येणार आहे. आपण जर हवेत उडणारा सुट घातला. तर आपण पक्षांप्रमाणे हवेत संचार करू शकतो. आता तर काय नवीन ऐकायला मिळाले की माणूस रॉकेट प्रमाणे उडणार" हवेला योग्य दिशेला प्रेशर दिल्यास माणूस वायू मार्गाने म्हणजे हवे ने येणे जाने म्हणजेच प्रवास करू शकतो. जर हे या काळी शक्य होऊ शकते. तर ते त्याकाळी का नाही. पडलेला साधारण प्रश्न आहे. की माणूस विज्ञानाला फार महत्त्व देतोय पण हे विज्ञान प्राचीन काळापासून चालत आलेल्या कार्यपद्धतीवर अवलंबून आहे. सांगायचं झालं तर छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करा. सकाळी उठल्या उठल्या जुन्याकाळी दरवाजा बाहेर ज्याला आपण अंगण म्हणतो त्यावर ती सडा शिंपला जायचं म्हणजे शाहू बाजूने पाणी फेकला जायचं तर त्यामधून होणारा माणसाचा काय फायदा बहुतांश वस्ती ही जंगलात असल्याकारणाने जमिनीवर ती सरपटणारे प्राणी हे जर त्या ठिकाणी असतील तर त्या अंगावरती पाणी पडल्यामुळे ते दुसऱ्या ठिकाणी निघून जातील यासाठी चारी बाजूने पाणी फेकला जात असे पण आज पाणी दिवस उजाडल्यानंतर फेकलेस कारण ती प्रथा आहे समजा धरणीकंप होऊन सर्व पुरावे नष्ट झाले आणि फक्त पुस्तक रुपी माहिती उरली आणि त्यामध्ये आपण केलेले संशोधन आपण वापरत असलेले सुख सुविधा याचा उल्लेख असेल पण त्या काळाच्या माणसाची बुद्धी हे मानायला तयार नसेल की आपल्या भूतकाळात असे कितीतरी चांगले संशोधन होऊन गेलेला आहे पण तेही या गोष्टीवरती का विश्वास ठेवते कारण की माणसाने आता प्रगती करण्याच्या नादात अधोगतीकडे सुरुवात केली आहे माणसाने कृती ऑक्सिजन तयार केला पण नॅचरल झाडांपासून आपल्याला मिळतो हे मनुष्य विसरत चालला आहे सुख सुविधा पाहिजे यासाठी निसर्गाची साखळी तयार करून दिलेली आहे त्या साखळीच्या कडीला मोडण्याचा प्रयत्न करत आहे का तर म्हणे प्रगती करायची आहे राहण्यासाठी घरावर त्यासाठी जंगलावरती कब्जा करायची त्या ठिकाणी असलेली हिरवीगार झाली तोडायची आणि सिमेंट जंगल उभा करायचा फक्त निवारा पाहिजे या एका गोष्टीसाठी माणूस स्वतःचा किती नुकसान करून घेतो झाडांपासून मिळणाऱ्या अन्न याचाही तो नाश करत आहे हे त्याला समजत नाही निवाराच्या शोधामध्ये अन्नापासून कोसळ दूर जात असलेला माणूस आणि भविष्यामध्ये ज्यावेळेस अन्नाची गरज भासेल त्यावेळेस ते उत्पन्न करण्यासाठी पृथ्वीवरती जमीन नसेल की ज्या ठिकाणी बिहार होता येईल आणि त्यापासून उत्पन्न घेता येईल अशी कोणतीही जागा नसेल तर चालेल पुढील भागात
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा