अंत नसलेल्या गोष्टी चा अंत भाग -2

अंत नसलेल्या गोष्टीचा अंत,शेवटी काय तर अंत नसलेल्या गोष्टीचा कधीही अंत नसेल असे मला वाटत आहे. आपण कितीही विचार केला तरी विषय नेहमी नविन असेल पण त्या विषयाचा अंत होणार नाही. विषय कोणताही असो जसे की जीवन जगणे असो किंवा जीवनाचा आनंद घेणे असो नेहमी जीवन जगतांनी आपल्याला अनेक अडचणी येतात. पण कर्तव्यदक्ष असणारे नेहमी प्रत्येक संकटांना सामोरे जातात.एखादे संकट आले म्हणून ते खचून जात नाही.नेहमी संकटांशी दोन हात करायला तयार असतात. जसे की आपण ज्यांना  छोटी छोटी संकटे म्हणतो ते मुळात छोटी नसतात. फक्त आपला समजण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो आपण एखाद्या संकटांना छोटे किंवा मोठे असे विभगतो पण मुळात संकट हे संकट असते ते कधीही छोटे किंवा मोठे नसतात. फक्त एखाद्या संकटावर उपाय लवकर मिळतो किंवा अनुभव असल्याकारणाने ते हाताळायला सोपे जाते म्हणजे ते संकट छोटे आहे असा त्याचा अर्थ होत नाही. उदा.आपण रस्त्याने चालतो तेव्हा जर आपल्या पायात एखादा काटा घुसला ते आपण घाई केली की तो काटा आपल्या पायात मोडतो, पण समजा अगोदर आपल्या पायात काटा मोडण्याचा अनुभव जर आपल्याला असेल तर दुसऱ्या वेळी मात्र आपण तसे होऊ नये यासाठी दक्षता घेतो. म्हणजे काय तर काटा पायात मोडणार नाही याची काळजी घेतो. जर पायात काटा घुसला की आपण पाय आल्हाद वरती हवेत धरतो आणि सावकाश तो पायातून पूर्ण पणे बाहेर येईल याची काळजी घेतो. आणि हा आपण जर संकटांशी सावकाश दोन हात केले ना तर त्या नुकसान फारच कमी प्रमाणात होते. म्हणजे काळजी घेतली ते पायात घुसलेला काटा........


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अभ्यासक्रम म्हणजे काय सांगून त्याचे स्वरूप , रचना निकष आणि तत्वे ...

अभ्यासक्रम रचनेची विविध पद्धती स्पष्ट करा.

अभ्यासक्रमाचे स्वरूप