राम मंदिराला आलापल्लीच्या जंगलातील उच्च प्रतीचे सागवान....
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्या येथील राम मंदिराच्या उभारणीचे काम जोमाने सुरू आहे. या मंदिराच्या दरवाजांसाठी गडचिरोली जिल्ह्यातील उत्कृष्ट सागवानासाठी प्रसिद्ध असलेल्या आलापल्ली डेपोतील उच्च प्रतीच्या सागवान लाकडांचा वापर केला जाणार आहे. यासाठी लार्सन अँड टूब्रो कंपनीचा चमू आलापल्लीत दाखल झाला आहे.
आलापल्ली च्या जंगलातील उच्च प्रतीचे सागवान देशात प्रसिद्ध आहे. राम मंदिर ट्रस्टने आणि या मंदिराची उभारणी करत असलेल्या लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या चमूने देशाच्या इतरही काही भागातील सागवानाची चाचणी केली. पण राम मंदिराच्या उभारण्यात लागणाऱ्या दरवाजाचे आणि खिडक्यांसाठी अपेक्षित दर्जाचे सागवान त्यांना मिळाले नाही. आलापल्ली येथील महाराष्ट्र वन विकास मंडळाच्या डेपोतील (एफ डी सी एम) सागवान मात्र त्यांच्या पसंतीत उतरले आहे. याप्रमाणे लाकडांचा दर्जा तपासून उत्कृष्ट असणाऱ्या लाकडांची निवड करणे सुरू केले आहे.
नक्षी कामासाठी होणार वापर
आलापल्लीतील सागवानाचा वापर 45 दरवाजे खिडक्यांसाठी व राम मंदिराच्या पहिल्या माळ्यावरील धार्मिक चिन्हे कोरण्यास केला जाणार आहे. त्यासाठी सागवान कापून अयोध्येला नेले जाणार आहे. आलापल्ली येथील वन विभागाचा सागवान डेपो आणि आरा मशीन ब्रिटिश कालीन आहे.
माजी राज्यमंत्री अंबरीशराव आत्रम यांनीही आलापल्लीच्या आरमाशिनला भेट देऊन लाकडांची पाहणी करत चमूला मार्गदर्शन केले. देशवासीयांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या राम मंदिरासाठी आपल्या भागातील लाकडांची निवड होणे ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा