म्हंटले थोडेसे बोलावे तुझ्याशी
म्हंटले थोडेसे बोलावे तुझ्याशी
पण सुरवात कशी करावी हेच समजेनासे झाले आहे.
तुला तर माझ्या वागण्याचा खूपच राग येत असेल.
काल जर तू मला समजावले नसते तर कदाचीत माझं खूप मोठे नुकसान झाले असते.
पण आता हि असेच जाणवते कि शेवटी नुकसानच केले मी माझे स्वतःहाचे,
तुला त्रास देणे तुझ्या भावना समजावून न घेणं,
तुला वेळ न देणे,
अशा छोट्या मोठ्या चुका तर मी नेहमीच करत असतो, पण हे चालणार तरी किती दिवस.
तू मला आणखी किती दिवस सहन करणार आहे, थोडाफार तरी मी तुझा विचार करायला हवा होता,.
तुझ्या साठी एक विरहाचा क्षण ..
'क्षण'
मी माझ्या जीवनातला वेगळा काढून ठेवला आहे,
तो माझ्यासाठी चा एक बहुमुल्ल्य 'क्षण' आहे,
कितीही भांडण झाले तरी आपल्याला जवळ आणतो
तो एक 'क्षण' च आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा