इतिहास विषयाकडे पाहण्याचा दृष्टीकोन
वर्तमान काळातील विद्याथीचा इतिहास विषयाकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यापक बनविणे, ऐतिहासिक साधने व वस्तू यांच्या संरक्षणासंबंधी जाणीव निर्माण करावे व त्यांच्या जतनाबाबतचे महत्व पटवून देणे, पर्यावरण संरक्षण बाबत जाणीव जागृती विकसित करणे, देशातील बदलत्या काळानुसार प्रगतीची दिशा दाखविणे या सारख्या अपेक्षांची पूर्तता करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. देशाचा भावी नागरिक हा देशाच्या वर्ग खोल्यामधून परिपुष्ट होत असतो ह्याचे भान ठेवून विद्यार्थ्याच्या व्यक्तिगत आशा आकांशा आणि उज्ज्वल भविष्य घडविण्याची भूमिका या अभ्यासक्रमात अंतर्भूत करण्यात आलेली आहे. इतिहासाची व्यावसायिक उपयोजिता आणि वर्तमानाचे भान ठेवून भविष्याकडे उत्तुंग झेप घेण्याचे सामर्थ्य विद्यार्थ्यामध्ये निर्माण होईल अशी खात्री वाटते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा