शिवाजी महाराजांचा कौटुंबिक परिचय .


 


शिवाजी महाराजांचा कौटुंबिक परिचय . 

शिवाजी महाराजांनी एकंदर ८ विवाह केले. या ८ राण्यांची नावे पुढील प्रमाणे आहे. 

१) सगुणाबाई 

२) सईबाई

३) सोयराबाई 

४) पुतळाबाई  

५) लक्ष्मीबाई 

६) सकवारबाई 

७) काशीबाई

८) गुणवंताबाई. 

महाराजांना २ मुले होती १) संभाजी २) राजाराम.

राज्यभिषेकाच्यावेळी महाराजच्या ४ राण्या ह्यात होत्या. संभाजी ची आई सईबाई तो केवळ अडीच वर्षाचा असताना मरण पावली. राज्याभिषेक होण्याप्रसंगी पट्टराणि होण्याचा मान सोयराबाई स मिळाला; परंतु युवराज होण्याचा मान संभाजी ला मिळाला. त्यातून रायगडावर तंटे बखेडे सुरू झाले.शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतर जवळजवळ १ महिन्यांनी राणी पुतळाबाई सती गेली. शिवाजी महाराजांना ६ मुली होत्या. या सर्व मुलींचे विवाह मानांकीत घराण्यातील पुरुषांशी झाले.परंतु शिवाजी महाराजांचा एकही जावई त्यांच्या स्वराज्य कार्यात सहभागी झालेला आढळून येत नाही. शिवाजी महाराजांची आई जिजाबई ही महाराजांच्या राज्याभिषेकापर्यन्त म्हणजे जून १६७४ पर्यंत हयात होत्या. आपल्या मुलाला सिंहासनावर बसल्याचे पाहून त्या माऊली च्या आनंदाला पारावार राहिला नाही. राज्याभिषेक झाल्यानंतर केवळ १२ दिवसांनी म्हणजे १७ जून १६७४ रोजी जिजाबाई चा पाचाड येथे राहत्या घरात मृत्यू झाला.....      

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अभ्यासक्रम म्हणजे काय सांगून त्याचे स्वरूप , रचना निकष आणि तत्वे ...

अभ्यासक्रम रचनेची विविध पद्धती स्पष्ट करा.

अभ्यासक्रमाचे स्वरूप