उद्गारार्थी वाक्य. ज्या वाक्यातून भावनेचा उद्गार स्पष्ट होतो अशा विधानाला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. याचे उदाहरण पुढीलप्रमाणे. 1 ) अरे ! आज इकडे कसे तुम्ही ? 2 ) अरे बापरे ! केवढा मोठा साप हा. 3 ) वा ! किती सुंदर चित्र आहे. 4 ) शी, शी ! किती कचरा झाला घरामध्ये. 5 ) बापरे ! त्या सभेला किती मोठी गर्दी होती.