इतिहास विषयाची संरचना

इतिहास विषयाची संरचना
  राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला/साहित्य, विज्ञान, इतर स्थानिक प्रादेशिक राष्ट्रीय जागतिक.
वरील संरचनेमध्ये इतिहासाचा काळ, ऐतिहासिक घटनेचे स्थळ आणि ऐतिहासिक घटनेचे क्षेत्र यांचा विचार केलेला आहे. इतिहासाची हि संरचना इतिहासाच्या प्रकारांवर अवलंबून आहे. म्हणजेच काळानुसार प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास, अर्वाचीन इतिहास अशी त्या त्रिमितीय ठोकळ्याची हि एक बाजू झाली. त्रिमितीय ठोकळ्याची दुसरी बाजू आहे. स्थळानुसार इतिहासाची ज्यात स्थानिक इतिहास, प्रादेशिक इतिहास, राष्टीय इतिहास आणि जागतिक इतिहास येतो. त्रिमितीय ठोकळ्याची तिसरी बाजू हि क्षेत्रानुसार किंवा ऐतिहासिक घटनेच्या विषयानुसार आहे. उदा. राजकीय इतिहास, सामाजिक इतिहास, आर्थिक इतिहास, धार्मिक इतिहास, कला व साहित्याचा इतिहास, विज्ञानाचा इतिहास व याशिवाय येणारे क्षेत्रे किंवा विषय यासाठी एक रकाना इतर या नावाने सोडला गेला.
      वरील ठोकळ्यामध्ये इतिहासाची कोणतीही घटना बसू शकते. उदा. पानिपतचे तिसरे युद्ध अशी घटना असेल तर वरील त्रिमितीय ठोकळ्यातील एक ठोकला बाजूला काढता येतो ज्याला पुन्हा तीन बाजू आहेत. तो ठोकला कदाचित पानिपतच्या तिसऱ्या युद्धाविषयीची जागा सांगणारा असेल म्हणजे पानिपतचे तिसरे युद्ध मध्ययुगीन भारताचा राजकीय इतिहास होय. म्हणजे काळातील मध्ययुग, स्थळातील राष्ट्रीय इतिहास आणि क्षेत्रातील राजकीय इतिहासाची बाजू येणे अकबरी ह्या ग्रंथाविषयी जेव्हा वर्गात आपण बोलतो तेव्हा येणे अकबराचे लेखन त्यातील आशय हि इतिहासातील महत्वाची घटना असते. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अभ्यासक्रम म्हणजे काय सांगून त्याचे स्वरूप , रचना निकष आणि तत्वे ...

अभ्यासक्रम रचनेची विविध पद्धती स्पष्ट करा.

अभ्यासक्रमाचे स्वरूप