इतिहास विषयाची संरचना सविस्तर स्पष्ट करा.
१. इतिहास विषयाची संरचना सविस्तर स्पष्ट करा.
उत्तर - प्रत्येक विद्याशाखेची आशय घटकांची मांडणी एका विशिष्ट संरचीत स्वरूपात असते इतिहासाच्या आशय घटकांची मांडणी हि अशा वेगवेगळ्या प्रकारे करता येईल त्यातील दोन प्रकारच्या मांडण्या आता आपण अभ्यासणार आहोत.
आशययुक्त अध्यापन पद्धतीची सुरवात महाराष्ट्रामध्ये साधारणत: १९८८०-८९ च्या सुमारास झाली ह्या विषयाची अभ्यास करण्याकरता त्यावेळेचे पुणे विद्यापीठातील शिक्षणकशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. व्ही. एस. देशपांडे यांनी आशययुक्त अध्यापनाचा विचार करण्यासाठी काही तज्ज्ञांच्या निमंत्रित केले होते. त्यामध्ये डॉ. ए. एन. जोशी , प्रा. जी. आर. बेळे, डॉ. शंकर अभ्यंकर, डॉ. श्रीमती जगताप, डॉ. रामदास बरकले यांचा समावेश होता. या पुणे अभ्यासगटाचे नेतृत्व डॉ. व्ही. एस. देशपांडे करत होते. डॉ.ए. एन. जोशी यांनी विद्याशाखेच्या संरचनेविषयी एक छोटेसे व्याख्यान दिले. आणि प्रत्येकाने आपापल्या विषयांची संरचना तयार करावी असे आवाहन केले. त्या दिवशी ज्या दोन संरचना तयार झाल्यात त्यात एक होती डॉ. व्ही. एस. देशपांडेंनी तयार केलेली मराठी भाषेची संरचनेची वृक्षाच्या प्रतिमेत होती तर दुसरी संरचना डॉ. रामदास बरकले यांनी तयार केलेली इतिहासाची संरचना जी त्रिमितीय ठोकळ्याच्या स्वरूपात होती. हीच ती आज सर्वत्र वापरली जात असेलेली डॉ. रामदास बरकले यांची इतिहासाची संरचना होय.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा