वाक्याचे प्रकार 1) विधानार्थी वाक्य

 वाक्याचे प्रकार 

एखाद्या घटकाचा अर्थ स्पष्ट करणाऱ्या शब्दांचा समुच्चय म्हणजे वाक्य होय. परंतु या ठिकाणी केवळ शब्दांचा समूह असा त्याचा अर्थ अभिप्रेत नाही. तर त्या समूहातील शब्दापासून विशिष्ट अर्थ तयार होणे आवश्यक असते. आपण बोलतो किंवा लिहितो म्हणजे आपले विचार क्रमाक्रमाने आपण व्यक्त करतो. आपला एक संपूर्ण विचार म्हणजेच वाक्य होय. कोणतेही वाक्य हे दोन घटकांची पूर्ण झालेले असते. अशा अर्थानुसार वाक्यांचे वेगवेगळे प्रकार दिसून येतात ते पुढील प्रमाणे सांगता येईल. 

 १) विधानार्थी वाक्य 

    ज्या वाक्यांमध्ये केवळ विधान केलेले असते अशा वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. या वाक्यांमध्ये होकारार्थी  असेल तर त्याला होकारार्थी विधान ( करणरूप ) आणि वाक्य नकारार्थी असेल तर त्याला   "नकारार्थी" विधान असे म्हणतात.

१) आपल्या अभ्यासाकडे आपण लक्ष द्यावे. 

२) नरेंद्र मोदी यांच्या सभेला मोठी गर्दी होती. 

३) हे जग सुख दुः खाने भरले आहे.

४)    तुमचे उपकार मी मुळीच विसरणार नाही.

५) व्यक्ति आपल्या भविष्याचा शिल्पकार असतो.

६) मी रोज सकाळी उठून अभ्यास करतो. ( होकरार्थी )

७) मी नियमित अभ्यास करत नाही. ( नकारार्थी )

८) माणसाने नेहमी खरे बोलावे. 

९ ) मी शाळेत जात नाही. 

१०) आम्ही जेवण घेणार नाही. ( नकारार्थी ) 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

GDCA कोर्सची संपूर्ण माहिती GDCA Course Information

अभ्यासक्रम म्हणजे काय सांगून त्याचे स्वरूप , रचना निकष आणि तत्वे ...

SAP कोर्सची संपूर्ण माहिती SAP Course Information