आता घ्या चार लाखाचे अनुदान, विहीर करण्यासाठी
शेतीला बाराही महिने पाणी मिळावे, यासाठी शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला विहीर हि योजना शासनाने आणली आहे. महाराष्ट्र रोजगार हमी योजने अंतर्गत असलेल्या या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी चार लाख ( 4 lac ) रु अनुदान देण्याची घोषणा काही महिन्यापूर्वी औरंगाबादचे पालकमंत्री तथा रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांनी केली होती. या अनुषंगाने आता शेतकऱ्यांकडून विहिरीसाठी अर्ज येण्यास सुरुवात झाली आहे.
काय आहे योजना
कृषी विभागाने 'मागेल त्याला शेततळे' हि योजना आणली होती.
शेततळ्याच्या आकारानुसार अनुदानाची रक्कम ठरविण्यात आली होती.
आता महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत' मागेल त्याला विहीर' या योजनेची घोषणा रोहयोमंत्र्यांनी
केली.
ग्रामसभेकडून ठराव घेतल्यानंतर पंचायत समितीकडे यासाठी अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यास विहीर मंजूर होते.
*अर्ज कसा कराल
रोहयोंतर्गत ज्या शेतकऱ्यास शेतात विहीर खोदायची आहे, त्याने सर्वप्रथम ग्रामपंचायत कडे अर्ज करावा या नंतर हा ग्रामसभेत ठराव मंजूर झाल्यानंतर या ठरावासह पंचायत समितीकडे अर्ज करावा लागतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा