संस्कृति या शब्दाचा अर्थ
संस्कृति या शब्दाचा अर्थ
संस्कृति या संकल्पनेची आपण व्याख्या स्पष्ट करू शकत नाही. ती व्याख्या विरहित आहे. कारण ती काळानुरूप बदलत असते. बदलणार्या गोष्टीची एक संकल्पना राहू शकत नाही.
संस्कृती म्हणजे लक्षणिक अर्थाने मानवी कृतीउक्तीजन्य समग्र वर्तनाचेच प्रगट दर्शन आहे. शेती, पशुपालन, स्थापत्य, धातुकाम, यंत्र निर्मिती, वस्त्रोत्पादन, अर्थोत्पादन, या गोष्टी ची संपन्नता भौतिक संस्कृतीत अभिप्रेत असते. धर्म, नीती, कायदा, विद्या, ललितकला, वाड:मय, सभ्यता, शिष्टाचार, इ. गोष्टीचा समावेश आध्यात्मिक संस्कृतीत होतो. या दोन्ही प्रकारच्या संस्कृतीत अनोण्यसंबंध आहे. मनुष्याच्या मानसिक आशा आकांक्षा ना भौतिक सुधारणामुळे मूर्त स्वरूप येते आणि भौतिक सुधारणाची इमारत आध्यात्माच्या पायावर उभी राहते. तिला संस्कृतीचा दर्जा प्राप्त होतो. बाह्य समृद्धी बरोबर च मन, बुद्धी, पंचेद्रिये यावर नियंत्रण असावे लागते आणि हे सर्व साध्य करण्याची जी प्रक्रिया तिला सामान्यता; संस्कृती असे म्हणतात . संस्कृतीचा संबंध मानवीजिवनाशी , समाजजीवनाशी आहे . जीवन गतिमान आहे , विकसनशील आहे त्याचप्रमाणे संस्कृतीही गतिमान व विकसनशील आहे . संस्कृतीही गतीमानता आणि विकसनशीलता भौतिक जीवनाच्या घटकांवर असते . त्याचप्रमाणे संस्कृतीच्याच धर्म , नीती , कायदा , कला इत्यादी घटक संस्थांच्या विकासावरही अवलंबून असते. जुने आणि नवे ही शक्यता संस्कृतीतही असते. जुन्याचा र्यास आणि नव्याचा उदभव, जुन्यातुनच नव्याची श्रेयस्कारक निष्पत्ती, अथवा संपूर्णपणे नवेपण या शक्यताही संस्कृतीत असतात. म्हणून संस्कृतीच्या स्थिती- गतीची ही निच्छिती विचारप्रणाली असू शकते. संस्कृतीचा विकास निरनिराळ्या अवस्थांतरातूनच होतो; परंतु संस्कृती मध्ये परंपरागत असा एक अंशभाग असतोच,.......
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा